लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : सागाव (ता. शिराळा) येथील अशोक शंकर कोकाटे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष नंदू महाराज यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
गेल्या २५ वर्षांपासून कोकाटे वारकरी संप्रदायातून धार्मिक कार्यक्रमात सक्रिय आहेत. गोरक्षनाथ पालखी सोहळ्यात पायी वारीच्या नियोजनामध्ये त्यांचा सहभाग असतो. गुरुचरित्र पारायणात गेली ३६ वर्ष, विश्वास साखर कारखान्यावरील गणेश मंदिरात चिंतामणी विजय ग्रंथाचे सलग १२ वर्ष पारायण व्यासपीठ चालक म्हणून ते कार्यरत आहेत. सागावमध्ये ७०० वाचकांच्या पारायण सोहळ्यात, १०८ वाचकांच्या गाथा पारायणाचे नियोजन करण्यात त्यांचा सहभाग आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या मंदिरात व्यासपीठ चालक, नाशिक कुंभमेळ्यामध्ये एक महिना सहभाग दर्शविला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष राजू माने, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, रेवणनाथ भोसले, शंकर पाटील, मानसिंग औताडे, अंत्रीचे सरपंच संजय पाटील व संजय सुतार उपस्थित होते.
फोटो ओळी : सागाव येथे वारकरी संप्रदाय जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक कोकाटे यांना निवडीचे पत्र देताना जिल्हाध्यक्ष नंदू महाराज.