आशा, गटप्रवर्तकांनी प्रशासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना निवेदन स्वीकारले. तसेच थकीत मानधन त्वरित देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, असे आश्वासनही डॉ. पोरे यांनी दिले. निवेदनात म्हटले की, आशा व गटप्रवर्तक महिलांना कोरोनामध्ये अनेक योजनांमधील केलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. सर्व महिलांना माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेतील कामाचाही मोबदला मिळाला नाही. क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोधमोहीम योजना, कोरोनाचे काम केल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून मिळणारा मोबदलाही अद्याप मिळालेला नाही.
आंदोलनामध्ये कॉ. विजय बचाटे, ऊर्मिला पाटील, विद्या कांबळे, अफसाना शिकलगार, चांदणी साळुंखे, अंजली पाटील, सुवर्णा पाटील, जयश्री शेंडगे, राखी पाटील, आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
चौकट
आशा, गटप्रवर्तकांना आठ दिवसांत मानधन देणार : मिलिंद पोरे
डॉ. मिलिंद पोरे म्हणाले, दि. १ नोव्हेंबर २०२० पासून वाढीव मानधन आशांना दरमहा दोन हजार रुपये व गटप्रवर्तक महिलांना दरमहा तीन हजार रुपये फरकासह आठ दिवसांत देण्यात येणार आहे. इतरही योजनांमधील आशा व गटप्रवर्तक यांची जी थकबाकी राहिलेली आहे त्याबद्दल तातडीने कार्यवाही करण्यात येईल.