शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तब्बल ७० टन फटाके, फुले, साहित्याचा कचरा जमा; महापालिकेने रात्रीत केली स्वच्छता

By शीतल पाटील | Updated: November 13, 2023 16:48 IST

सांगली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगली , मिरज आणि कुपवाडकरांनी तब्बल ७० टन कचरा केला. फटाके, फुले, लक्ष्मीपूजन साहित्यासह खाद्यपदार्थांचा ...

सांगली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाडकरांनी तब्बल ७० टन कचरा केला. फटाके, फुले, लक्ष्मीपूजन साहित्यासह खाद्यपदार्थांचा हा कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्रीत उचलून कर्तव्याचे दर्शन घडविले. त्यामुळे सोमवारी सकाळी मुख्य बाजारपेठेतील रस्ते चकाचक झाले होते. रविवारी दिवसभरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी २८१ टन कचरा संकलन केले होते.महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. पण त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचेच दिसून आले. लक्ष्मीपूजनासाठी ठिकठिकाणी केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या विक्रेत्यांची गर्दी होती. रात्री बहुतांश विक्रेत्यांनी झावळ्या, खुंट तशाच टाकल्या होत्या. शहरातील मुख्य बाजारपेठेत लक्ष्मीपूजन साहित्य विक्रेत्यांचे स्ट़ॉल लागले होते. तसेच किरकोळ कापड विक्रेत्यांनी रस्त्यावर व्यवसाय मांडला होता. रविवारी रात्री विक्रेते त्यांच्याकडील कचरा रस्त्यावर सोडून निघून गेले होते. लक्ष्मीपूजनानंतर शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. टाके आणि फुलांचा कचरा रस्त्यावर पडून होता.प्रशासक पवार यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांतील बाजारपेठेतील कचरा रात्रीत संकलन करण्यासाठी विशेष पथकाद्वारे नियोजन केले. सांगलीत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, तीन स्वच्छता निरीक्षक, चार मुकादम आणि ५० कर्मचाऱ्यांनी रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत मारुती रोड, कापड पेठ, गणपती पेठ, बालाजी चौक, हरभट रोड, मित्र मंडळ चौक या परिसरातील कचरा उचलला. मिरज आणि कुपवाडमध्ये ५० ते ७० कर्मचारी रात्रीच्या वेळी स्वच्छता मोहिमेवर होते. रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत महापालिकेने २८१ टन कचरा संकलन केले होते. यात ७० टन कचरा हा फटाके, फुले, दिवाळी साहित्यांचा होता.

टॅग्स :Sangliसांगली