शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या मालमत्तांवर मालकीचे फलक लावणार- अरुण राजमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:24 IST

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर अनेकदा अतिक्रमण होते. त्यानंतर त्यावर कोर्टकचेऱ्यासारखे प्रकार करावे लागतात.

ठळक मुद्देनिधी उपलब्धतेनंतर शाळा दुरूस्तीची कामे; मालमत्तांची तालुकानिहाय सूची तयार करण्याचे आदेश

सांगली : जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर अनेकदा अतिक्रमण होते. त्यानंतर त्यावर कोर्टकचेऱ्यासारखे प्रकार करावे लागतात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जि.प.च्या मालमत्ता आहेत, त्या ठिकाणी मालकीचे फलक लावण्याच्या सूचना बांधकाम सभापती अरूण राजमाने यांनी शुक्रवारी दिल्या.

सभापती अरूण राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची सभा झाली. यावेळी सदस्य अरूण बालटे, संजीव पाटील, सरदार पाटील, जग्गनाथ माळी, जयश्री पाटील, आशा पाटील आदी सदस्य उपस्थित होते. सचिव म्हणून जे. वाय. माळी यांनी काम पाहिले.

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांना नोंदणी क्रमांक देणे आवश्यक असून जि. प.च्या मालकीच्या मालमत्तांची तालुकानिहाय सूची तयार करण्याचे आदेश सर्व तालुक्यातील शाखा अभियंत्यांना देण्यात आले.तसेच दुकान गाळे धारकांकडील प्रलंबित भाडेवसुलीबाबत चर्चा झाली. दलित वस्तीबाबत परिपूर्ण प्रस्ताव नसल्याने त्यांना मान्यता मिळू शकली नव्हती. मात्र नव्याने ३० कोटीचा निधी मिळाल्याने जास्तीत जास्त कामे मंजूर करून घेण्यासाठी प्रथम कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश सर्व उपअभियंत्यांना देण्यात आले. तसेच कणेगाव (ता. वाळवा) येथील स्वागत कमानीच्या बांधकामास मंजुरीही देण्यात आली.शाळांच्या दुरूस्तीसाठी निधीची प्रतीक्षा१५ जून रोजी जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शाळा दुरूस्तीची कामे प्रलंबित आहेत. ती तात्काळ पूर्ण करावीत, त्यासाठी एखाद्या अपघाताची वाट बघणे चुकीचे ठरणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यावर इमारत दुरूस्तीसाठी लवकरच नियोजनकडून निधी उपलब्ध होणार आहे. तो निधी मिळताच ही कामे प्रामुख्याने केली जातील, असे सभापती राजमाने यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण