शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

कार्यनिष्‍ठेच्‍या जोरावर अरुणअण्णा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST

सामान्‍य कुटुंबातील व्‍यक्‍ती अथक परिश्रम आणि कार्यनिष्‍ठेच्‍या जोरावर उच्चपदावर जाऊ शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्‍हणजे क्रांतिअग्रणी डॉ. जी. ...

सामान्‍य कुटुंबातील व्‍यक्‍ती अथक परिश्रम आणि कार्यनिष्‍ठेच्‍या जोरावर उच्चपदावर जाऊ शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्‍हणजे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे चिरंजीव अरुण (अण्‍णा) लाड आहेत. त्‍यांची नुकतीच महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून ‘आमदार’पदी निवड झाली. त्‍यांना पुढील वाटचालीस शुभेच्‍छा..!

अरुण अण्‍णा लाड यांचा जन्‍म २९ ऑक्‍टोबर १९४७ रोजी कुंडल येथील क्रांतिकारकांच्‍या घरात झाला. साहजिकच त्‍यांना क्रांतीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. वडील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड हे स्‍वातंत्र्यसंग्रामात कोणत्‍या ना कोणत्‍यातरी मोहिमेवर नेहमी असायचे. असे असताना या क्रांतिकारकांचे जिणे म्‍हणजे एक धगधगता अंगारच. असे हे सर्व अरुणअण्‍णा लाड यांनी लहानपणापासून जवळून पाहिले आणि अनुभवले देखील. क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे सातारा प्रतिसरकारमधील सामाजिक उपक्रम व छोडो भारत आंदोलनातील क्रांतिकारक कार्याचा तसेच राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि विशेषतः सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले या सामाजिक सुधारकांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव अरुणअण्णांच्या जीवन कार्यावर साहजिकच पडत गेला.

आज पुणे पदवीधर मतदारसंघातून त्‍यांना मिळालेले यश म्‍हणजे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्‍या विचारांचा विजयच म्‍हणावा लागेल. कारण गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात असणाऱ्या या कुटुंबाला न्‍याय मिळावा, अशी सामान्‍य जनतेतून तीव्र इच्‍छा होती. गतवेळी दोन नंबरचे मताधिक्‍य देऊन जनतेने आपले प्रेम दाखवून दिलेच होते. त्‍याच जोरावर यावेळी राष्‍ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी अरुणअण्‍णा यांच्‍यावर विश्‍वास ठेवून महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली. ही उमेदवारी सार्थ ठरविण्‍यासाठी जणू कार्यकर्त्यांतूनच एकप्रकारचा उठाव झाला आणि सर्व कार्यकर्ते आपले सर्वकाही बाजूला ठेवून ‘आता नाही, तर कधीच नाही’ असे म्‍हणत पाचही जिल्‍ह्यात बेभानपणे कामाला लागले.

अरुणअण्‍णांचे चिरंजीव, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड यांनी मायक्रो प्‍लॅनिंग केल्यामुळे विजय सोपा झाला. त्‍यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे अरुणअण्णा आमदार झाले.

चौकट

अरुणअण्णांचा शपथविधी

कुंडल आणि परिसराच्‍या डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा म्‍हणजे अरुणअण्‍णांची आमदारकीचा शपथविधी. हा सोहळा मुंबई येथे पार पडला. जी. डी .बापू, अरुणअण्‍णा आणि शरदभाऊ या तिन्‍ही पिढ्यातील कार्यकर्त्‍यांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला.