शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासनामुळे आटपाडीत कृत्रिम दुष्काळ

By admin | Updated: June 10, 2016 00:18 IST

जयंत पाटील : टेंभू योजनेचे पाणी येऊनही टंचाई, तालुक्यात ठिकठिकाणी बैठका

आटपाडी : आतापर्यंत इथे निसर्गाचा दुष्काळ होता, पण टेंभूचे पाणी येऊनही या भागात दुष्काळ आहे, हे सरकारच्या चुकीच्या, अदूरदर्शीपणाच्या धोरणांमुळे पडलेला कृत्रिम दुष्काळ आहे. अशा दुष्काळाला आटपाडी तालुक्याला तोंड द्यावे लागत आहे, अशी टीका माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी येथे केली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी बुधवारी खरसुंडी, दिघंची आणि आटपाडीत बैठक घेतली. येथील श्री कल्लेश्वर देवस्थानच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पाटील म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांनी पैसे भरूनही आटपाडी तालुक्यात मिळाले नाही. सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली. जाणीवपूर्वक पाण्यापासून दूर ठेवणाऱ्यांविरुद्ध संघटित व्हायला पाहिजे. विहित नमुन्यात अर्ज करूनही पाण्यासाठी अडवणूक केली जात असेल, त्यांना आपला नमुना दाखविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे.कृष्णा नदी पावसाळ्यात भरून वाहते तेव्हा शासनाने शेतकऱ्यांनी पैसे भरण्याची वाट न पाहता आटपाडी तालुक्यातील तलाव पाण्याने भरून द्यावेत. टेंभू योजना पूर्ण सक्षमतेने सुरू करून शेतकऱ्यांना पाण्याची आवर्तने ठरवून दिली पाहिजेत.माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, ज्यांनी आर. आर. पाटील, जयंतराव यांच्याकडून कामे करून घेतली, आता ते इथं नाहीत. निवडणुकीत हार-जीत होत असते. टेंभू योजनेच्या पाण्यासाठी ५७ लाख ५७ हजार भरले. पण ६० दिवस पाणी दिले नाही. जेवढे पैसे भरले तेवढेही पाणी दिले नाही. आमदार बाबर यांचे नाव न घेता ते म्हणाले, तुमची काय ताकद आहे ती बघितली. आता पुन्हा पुढच्यावेळी पाणी सोडताना अडवून दाखवा. जयंतराव, आमच्या पाठीशी राहा. त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय रहात नाही. आॅगस्टमध्ये सगळे तलाव भरण्यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागेल. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. पवार हे काम कमी आणि राजकारण जास्त करत आहेत. आता यापुढे तक्रारी सांगण्यापेक्षा ते कार्यालयात असले तर बाहेर आणि बाहेर असले तर कार्यालयात त्यांना जाऊ देणार नाही. संघर्ष करू, तीव्र आंदोलने करू, याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही.यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश देशमुख, महिला आघाडीप्रमुख सौ. सुमन नागणे, आटपाडी पंचायत समिती सभापती सौ. सुमन देशमुख, उपसभापती भागवत माळी, जयंत नेवासकर, विठ्ठल पुकळे, राजू विभूते, श्रीरंग कदम यांची भाषणे झाली. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती सौ. विद्या देशपांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती सौ. सुमन मोटे, पंचायत समिती सदस्या सौ. सुनीता गायकवाड, बळी मोरे, आटपाडीच्या सरपंच सौ. स्वाती सागर यांच्यासह मोठया संख्र्येन कार्यकर्ते , नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)नगरपालिकेला आमदारांचा खोडा!आटपाडी नगरपालिकेचा निर्णय शासनाने अद्याप प्रलंबित ठेवला आहे. यावर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आ. बाबर यांचे नाव न घेता नुसता विधानसभेत प्रश्न विचारला म्हणजे काम संपते का? पुढे काय झाले? आटपाडीत नगरपंचायत झाली, तर काय फरक पडतो, पण त्यांचा नगरपालिका करण्यासाठी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला उमेदवार मिळणार नाही म्हणून ही धडपड आहे, असा आरोप केला. युवक राष्ट्रवादीचे ऋषिकेश देशमुख आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनीही असा आरोप केला.