शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन -म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:23 IST

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहभागी

सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यानंतर पुन्हा शेतकºयांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

शुक्रवार, दि. ७ जूनपासून संख येथून तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मायथळ कालव्यापासून फक्त दोन किलोमीटरवर असणाºया व्हसपेठ तलावात कालव्याद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजोबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बुद्रुक, लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच किलोमीटर कालव्याचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंडगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगाव या गावांना होईल. तेथेपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. देवनाळ-मेंढेगिरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर, शेड्याळ ओढापात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढापात्रातून दरीकोणूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल. लमाणतांडा, पांढरेवाडी, खंडनाळपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर, जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी, आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ उपस्थित होते.पूर्व भागात का नाही?तुकाराम महाराज म्हणाले, कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत पाणी आल्यास आसंगी-तुर्क, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकोंडी या गावांना पाणी जाऊ शकते. जतमधून म्हैसाळचे पाणी जर सांगोला व मंगळवेढ्यास जाऊ शकते, तर जत पूर्व भागात का मिळत नाही? 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकcollectorजिल्हाधिकारी