शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या झुल्यावरून सांगलीत आंब्याचे आगमन, गुढीपाडव्यासाठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 15:43 IST

उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वांना वेध लागतात ते फळांचा राजा अर्थात आंब्याचे. यंदाही सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू झाली असून, मर्यादित आवक आणि व्यापाऱ्यांचीही संख्या कमी असल्याने दर वाढलेलेच आहेत.

ठळक मुद्देमहागाईच्या झुल्यावरून सांगलीत आंब्याचे आगमनगुढीपाडवा मुहूर्तावर आवक वाढण्याची चिन्हे

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वांना वेध लागतात ते फळांचा राजा अर्थात आंब्याचे. यंदाही सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू झाली असून, मर्यादित आवक आणि व्यापाऱ्यांचीही संख्या कमी असल्याने दर वाढलेलेच आहेत.

सध्या रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याची आवक होत असून, कर्नाटकच्या आंब्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या आंब्याला डझनामागे ७५० ते १००० रुपयांपर्यंतचा दर द्यावा लागत आहे.गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर आवक वाढण्याची चिन्हे असली तरी, दर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. सांगली बाजारपेठेत फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असते. आता मात्र आवक वाढली असून, दरही चांगला आहे. विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये आठवड्यातील सोमवार, बुधवार व शनिवारी आंब्याचे व्यवहार होत असतात.

सध्या व्यापाऱ्यांचीच संख्या कमी असल्याने एकूणच उलाढालही मर्यादित आहे. रत्नागिरी हापूसच्या २ हजार ते साडेतीन हजार पेट्या, तर देवगड हापूसच्या १५०० ते २५०० बॉक्सची आवक होत आहे.यंदा झाडांना मोहर खूप आला, त्यावेळीच या हंगामात आंबे मर्यादित असणार याची चाहूल लागली होती. त्यानुसार जादा मोहर लागला असला तरी, कडाक्याची थंडी व अचानक वाढलेल्या उन्हामुळे मोहर पूर्णपणे गळून गेला. त्यामुळे रत्नागिरी हापूस, पायरी व देवगड हापूससह राज्यातील आंब्याची आवक मर्यादितच असणार असल्याचे सांगलीतील व्यापाऱ्यांनी सांगितले.गुढीपाडव्यासाठी मागणी वाढणार असल्याने सोमवारपासून होणाऱ्या सौद्यात आंब्याची आवक वाढणार आहे. त्यातही कर्नाटकचा आंबा अजूनही येत नसल्याने दर कमी होण्याची शक्यता नाही. येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने कर्नाटकातील आंबा येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर कमी होणार आहेत.

टॅग्स :MangoआंबाSangliसांगली