शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्यास अटक करा - अमोल वेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 13:44 IST

Mahatma Phule Wada sangli-पुण्यातील लोकसेवा अ‍ॅकेडमीचे संचालक अप्पा हातनुरे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध आम्ही करीत आहोत. याप्रकरणी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमहात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्यास अटक करा - अमोल वेटमरिपब्लिकन स्टुडंट युनियनतर्फे घटनेचा निषेध

सांगली : पुण्यातील लोकसेवा अ‍ॅकेडमीचे संचालक अप्पा हातनुरे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध आम्ही करीत आहोत. याप्रकरणी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात वेटम यांनी म्हटले आहे की, राज्यसेवा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी हे राज्यातील विविध भागातून पुणे येथे क्लासेसला जात असतात. याच पुण्यामध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा काढून स्त्री-शिक्षण, अस्पृश्य लोकांना शिक्षण देण्याचा इतिहास घडवला.

आजही फुले दाम्पत्यांचे सामाजिक कार्य अनेक समाजकंटकांच्या मनात खुपत असते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांची बदनामी विविध स्तरातून केली जात आहे. पुस्तकाच्या माध्यमातून असो अथवा संबंधित खासगी क्लासेसच्या वा सोशल मिडीयाच्या माध्यमातून खोटा इतिहास- पुरावे पेरण्याचे काम होत आहे.याचाच एक भाग म्हणजे पुण्यातील सदाशिव पेठेतील एका अ‍ॅकेडमीचे संचालक अप्पा हातनुरे यांनी संयुक्त पूर्व परीक्षाबाबतचा एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. यामधून हातनुरे याने महात्मा जोतिबा फुले यांच्या आजारपणाबाबत तसेच त्यांच्या मृत्यूसंदर्भात अत्यंत खालच्या दर्जेची भाषा वापरून जाहिरपणे अपमानित केले आहे.

हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होताच लोकांमध्ये रोष, संतापाची भावना निर्माण झाली. लोकांचा आक्रोश वाढत असल्याचे पाहून अप्पा हातनुरे या समाजकंटकाने माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. आधी जाणीवपूर्वक चूक करून माफी मागायची असा नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे. महापुरुषांची  बदनामी व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अप्पा हातनुरे यांना तत्काळ अटक व्हावी, त्यांची खासगी स्पर्धा क्लासेसची परवानगी रद्द करावी अशी मागणी वेटम यांनी केली आहे.

टॅग्स :Mahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाSangliसांगली