शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

माडग्याळात सशस्त्र दरोडा

By admin | Updated: February 24, 2017 23:55 IST

पाच ठिकाणी धुमाकूळ : पोलिसांवर दगडफेक; महिलांना मारहाण; अडीच लाखांचा ऐवज लंपास

माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथे गुरुवारी रात्री आठ जणांच्या टोळीने पाच ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकून, महिलांना कोयता व सत्तूरचा धाक दाखवून मारहाण केली. रोकड, सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज यावेळी लंपास करण्यात आला. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण टोळीने पोलिसांवर दगडफेक करून पलायन केले. माडग्याळ पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी भीतीने संपूर्ण रात्र जागून काढली. जत-उमदी रस्त्यावर हनुमान स्टिल ट्रेडर्स या दुकानाच्या गेटची जाळी तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात रामा चौधरी झोपले होते. चोरट्यांनी त्यांना सत्तूरचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील दहा हजाराची रोकड व मोबाईल काढून पलायन केले. चौधरी यांनी आरडाओरडा करताच चोरटे त्यांच्यावर दगडफेक करीत अंधाराचा फायदा घेत पळून गेले. दुसऱ्या घटनेत बसव्वा महादेव माळी ही महिला घरासमोर अंगणात झोपली होती. ही संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व लोखंडी पेटीतील सोन्याची बोरमाळ व नऊ हजाराची रोकड लंपास केली. तेथून चोरट्यांनी कृष्णा सावंत यांच्या घराकडे मोर्चा वळविला. सावंत कुटुंबही घराला कुलूप लावून अंगणात झोपले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सावंत यांची डाळिंब उत्पादनाची ८२ हजाराची रोकड व मोबाईल लंपास केला. चोरट्यांच्या हालचालींचा आवाज ऐकून सावंत यांची पत्नी जागी झाली. यांनी आरडाओरड केल्यानंतर वस्तीवरील सर्व लोक जागे होताच चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक करुन तेथूनही पळ काढला. चौथ्या घटनेत चोरट्यांनी केशव सावंत यांच्या दार उघडे असलेल्या घरात प्रवेश करून टेबलवर ठेवलेला मोबाईल लंपास केला. घरातील लोक झोपेतून उठण्यापूर्वी तेथून पळ काढला. ते अंकलगी रस्त्यावर डॉ. रवींद्र बुधिहाळ यांच्या रुग्णालयाजवळ जमा झाले. तिथे ते कन्नड भाषेत बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून तेथील घरातील एक महिला घराबाहेर येताच चोरट्यांनी तिला सत्तूरचा धाक दाखवित जिवे मारण्याची धमकी दिली. पण तिच्या घरात काहीच मिळाले नाही. त्यामुळे तिला घरात कोंडून बाहेरून कडी लावली. या महिलेने मोबाईलवरून डॉ. बुधिहाळ यांना याची माहिती दिली. डॉ. बुधिहाळ तिथे येण्यापूर्वीच चोरट्यांनी रुग्णालयातील ४५ हजाराची रोकड, वाहन चालविण्याचा परवाना, एटीएम कार्ड असा ऐवज घेऊन पलायन केले. (वार्ताहर)दुचाकी सापडल्याचोरट्यांचा शोध घेताना शुक्रवारी सकाळी पोलिसांना ओढापात्रात दोन दुचाकी सापडल्या आहेत. एका दुचाकीवर खडूने नंबर घातला आहे, तर दुसऱ्या दुचाकीला क्रमांकच नाही. दरोडेखोरांच्या या दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांचा पाठलाग सुरु झाल्यानंतर त्यांनी त्या ओढापात्रात सोडून पलायन केले. कदाचित या दोन्ही दुचाकी चोरीच्या असाव्यात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.