शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कारंदवाडीत सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:49 IST

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे हॉटेलची उधारी देण्यावरून दोन गटात तलवार, कोयता, सत्तूर अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये दोन महिलांसह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. आष्टा पोलिसात हिम्मत पाटील, किरण पाटील, उदय पाटील, बंडा उत्तरे यांच्यासह सतराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता ही ...

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे हॉटेलची उधारी देण्यावरून दोन गटात तलवार, कोयता, सत्तूर अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये दोन महिलांसह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. आष्टा पोलिसात हिम्मत पाटील, किरण पाटील, उदय पाटील, बंडा उत्तरे यांच्यासह सतराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. या प्रकारानंतर गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.कारंदवाडी (ता. वाळवा) येथील पेट्रोल पंपाजवळ मनोज वग्याणी यांचे हॉटेल एम. व्ही आहे. या हॉटेलमधील उधारीवरून बंडा उत्तरे व हॉटेल मालक मनोज वग्याणी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यातून महिन्याभरापूर्वी किरकोळ मारामारीही झाली होती. हा वाद गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मिटवला होता. रविवारी पुन्हा पूर्वीच्या भांडणातून पाटील गटाच्या दहा ते पंधरा तरुणांनी वग्याणी यांची बाजू घेऊन भांडणात मध्यस्थी करणाºया सुमित वाडकर याच्या घरात शिरून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचे वडील राजेंद्र वाडकर यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर मध्यस्थी करणाºया प्रतीक पाटील याच्यावरही संशयितांनी पेट्रोल पंपाजवळ हल्ला केला. यात त्याचे हात व पाय मोडले. प्रतीकची आई सुनंदा यांनाही मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोरांनी हॉटेल मालक मनोज वग्याणी व त्यांची आई पद्मजा वग्याणी यांच्यावरही शस्त्राने हल्ला केला. यात मनोज गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर आष्टा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या हल्ल्या प्रकरणी १७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आष्टा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. या हल्ला प्रकरणामुळे कारंदवाडी परिसरात खळबळ उडाली असून अफवा पसरत आहेत. गावात तणावपूर्ण वातावरण आहे.