शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

विरोधी उमेदवारांवरच ठरणार बेरीज-वजाबाकीचे गणित-इचलकरंजी वार्तापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:48 IST

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असले तरी इचलकरंजी शहरात मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठिंब्यावर मिळणाऱ्या मतावरच खासदार राजू शेट्टी

ठळक मुद्देइचलकरंजीत शेट्टी यांना आवाडे गटाची मोठी रसद मिळू शकते.

अतुल आंबी ।इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असले तरी इचलकरंजी शहरात मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठिंब्यावर मिळणाऱ्या मतावरच खासदार राजू शेट्टी यांना समाधान मानावे लागणार आहे. त्याचबरोबर विरोधी उमेदवार कोण असणार यावरही काही प्रमाणात मतांची बेरीज-वजाबाकी होणार आहे.

इचलकरंजी मतदारसंघात माने गटाचे स्वतंत्र अस्तित्व आहे; परंतु माजी खासदार निवेदिता माने यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गटातील प्रमुख मंडळी स्वतंत्र वाटचाल करीत भाजप व राष्टÑवादीमध्ये सामील झाले आहेत. माने घराण्यातील उमेदवार उभारल्यास ते एकत्रित येऊन धैर्यशील माने यांना सर्वतोपरी सहकार्य करतील, असे चित्र सध्या तरी आहे. या उलट सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळाल्यास माने गट एकसंधपणे न राहता स्वतंत्र पद्धतीने प्रचारात सहभागी होऊ शकतो. एकूण मतदारसंख्येत इचलकरंजी शहरात दोन लाख २० हजार मतदार आहेत. ग्रामीण भागातील पाच गावांचे मिळून ७१ हजार मतदान आहे. शहरातील मताधिक्य महत्त्वाचेच राहते. इचलकरंजी शहरात ‘स्वाभिमानी’चे संघटन नसले तरी चळवळीतील नेता ही प्रतिमा हेच शेट्टी यांचे आजपर्यंतचे भांडवल राहिले आहे.

इचलकरंजी शहरातील पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिरोळ तालुक्यातील दानोळी येथून वारणा नदीचे पाणी आणण्यासाठी भाजपचे या मतदारसंघातील आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासनदरबारी प्रयत्न करून योजना मंजूर केली. गत निवडणुकीतील विरोधी उमेदवार असलेल्या आवाडे घराण्याबरोबर शेट्टी यांचा चांगला घरोबा निर्माण झाला आहे. त्यामुळे कॉँग्रेसबरोबर ‘स्वाभिमानी’ची आघाडी झाली अथवा नाही झाली तरी आवाडे गट या निवडणुकीत शेट्टी यांच्यासोबत राहणार हे स्पष्टच आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही हे दोन्ही गट सध्या एकत्र आहेत. विरोधी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने हे आवाडे यांचे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे इचलकरंजीत शेट्टी यांना आवाडे गटाची मोठी रसद मिळू शकते. हे सर्व शेट्टी आघाडीत असेल तरच शक्य होणार आहे.कोण कोणाबरोबर असेलखासदार राजू शेट्टी : आवाडे गट, कारंडे गट, शेतकरी संघटना.धैर्यशील माने : आमदार सुरेश हाळवणकर, माने गट.सध्याचे मतदान :२ लाख ९१ हजार ३२७.पुरुष - १ लाख ५१ हजार ६२०स्त्री - १ लाख ३९ हजार ६५१इतर- ५६.गत निवडणुकीत मिळालेली मते :राजू शेट्टी : ९७,६९१कल्लाप्पाण्णा आवाडे : ७७,८७९मताधिक्य : १९ हजार ८१२.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली