शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धुमश्चक्री, पट्टा घेऊन अंगावर धावले

By शीतल पाटील | Updated: August 4, 2023 18:09 IST

नगरसेवक हारगे व थोरात या दोघांनाही सभागृहातून निलंबित केले

सांगली : महापालिकेचा सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार धूमचक्री झाली. अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अंगावर जयंत पाटील गटाचे नगरसेवक धावले. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी सभागृहातच कमरेचा पट्टा काढून थोराताना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. भाजप व काँग्रेसचे नगरसेवकांनी दोन्ही गटाला अडवल्याने मोठा अनर्थ टाळला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दोघांना सभागृहामध्ये काढले. महापालिकेची सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मिरजेतील अजितदादा गटाचे योगेंद्र थोरात व जयंतराव गटाचे गटाच्या संगीता हारगे यांच्या वार्डातील विकास कामावरून धुसफूस सुरू आहे. या वादाचे रूपांतर शुक्रवारी हाणामारी पर्यंत पोहोचले. सभेत संगीता हारगे यांनी मिरजेतील खाजा वसाहत रस्त्याचा प्रश्न मांडला या रस्त्याचे भूसंपादन झाले नसताना निविदा कशी काढण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला. यावर थोरात यांनी खुलासा करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा प्रशासनावर दबाव असल्यास आरोप केला. जयंतरावावर आरोप होताच गटनेते मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, विष्णू माने शेडजी मोहिते संगीता हरगे आक्रमक झाल्या.  महापौरांच्या आसनासमोर जात थोरातांनी माफी मागावी, अशी मागणी केली. यातून वाद वाढत गेला. जयंतराव गटाचे नगरसेवक थोरात यांच्या अंगावर धावून गेले. बागवान यांनी कमरेचा पट्टा काढत थोरातांना मारण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस व भाजपचे नगरसेवक धावून आले. त्यांनी जयंतरावांच्या गटातील नगरसेवकांना बाजूला केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही माफी मागण्याचे आदेश दिले. तसेच हारगे व थोरात या दोघांनाही सभागृहातून निलंबित केले. दोघांनाही सभागृह सोडल्यानंतर पुढील कामकाजाला सुरुवात झाली.

टॅग्स :Sangliसांगली