शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नगररचनेतील अधिकाऱ्यांना चाप

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

उपायुक्त रसाळ यांचे आदेश : अनधिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित

सांगली : शहरातील अनधिकृत बांधकाम, प्लॉटवर कारवाईबाबत नेहमीच हात झटकणाऱ्या पालिकेच्या नगररचना विभागाला उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या निर्णयाने झटका बसला आहे. अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालणाऱ्या नगररचनेला चाप लावत त्याची जबाबदारी या विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. अशी बांधकामे रोखण्यापासून पाडण्यापर्यंतची सारी कारवाई नगररचना विभागाला पार पाडावी लागणार आहे. तसे आदेश आयुक्त अजिज कारचे यांनी नुकतेच नगररचना विभागाला देत सहायक आयुक्त, प्रभाग अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामांचा वेलू गगनावर पोहोचला आहे. बिल्डरांनी परवानगीपेक्षा जादा बांधकामे करून स्वत:ची तुंबडी भरली आहे. गुंठेवारी भागात अनधिकृत प्लॉटिंग करून नागरिकांची फसवणूक झाली आहे. तरीही पालिकेने गांधारीची भूमिका घेत नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. बांधकाम परवाना देण्याचे अधिकार नगररचना विभागाला आहे; पण त्यानंतर संबंधिताने नियमानुसार बांधकाम केले की नाही, पार्किंग, तळघराचा विनापरवाना वापर, परवानगीविना जमिनीवर भराव घालणे अथवा खुदाई करणे, परवानगीतील अटी व शर्तीचे उल्लंघन, आरक्षित जागांवर बांधकामे, असे कोणत्याच बाबीची जबाबदारी नगररचना विभाग घेत नसे. अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाले तर, अतिक्रमण विभागाकडे बोट दाखविले जाईल. त्यात असे अतिक्रमण काढण्यात अनेक अडचणी येत असे. नगररचना विभागाने परवानगी दिल्याने बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्यातून पुन्हा पालिकेवर ताशेरे ओढले जातात. या साऱ्या प्रकाराला चाप लावण्यासाठी उपायुक्त प्रशांत रसाळ यांनी पुढाकार घेतला. त्यांनी या साऱ्या बाबींची माहिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. वास्तविक अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी नगररचनाकार व त्यांच्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. आता आयुक्त अजिज कारचे यांनी तसा आदेशच काढत जबाबदारी निश्चित केली आहे. सांगली व मिरजेतील नगररचनाकारांना यापुढे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास तातडीने पंचनामा करून त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांना कलम ५२, ५३ च्या नोटिसा देण्याचे अधिकारही नगररचनाकाराकडेच असतील. तसेच संबंधित बांधकाम पाडण्याची कार्यवाहीचा अहवाल सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकाऱ्यांना सादर करणेही बंधनकारक केले आहे. इमारत पाडण्याची जबाबदारी नगरअभियंत्यांमार्फत होणार असली, तरी त्याठिकाणी सहायक आयुक्त, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, कनिष्ठ अभियंते, आरेखक, अनुरेखक यांना घटनास्थळी उपस्थित राहावे लागणार आहे. आयुक्तांच्या या नव्या आदेशामुळे नगररचनातील गैरकारभाराला आळा बसणार आहे.तसेच केवळ बांधकाम परवाना देऊन नामानिराळे होणाऱ्या नगररचना विभागाला आता जबाबदारीची भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा या विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. (प्रतिनिधी)गुंठेवारी भागात अनधिकृत प्लॉटिंगगुंठेवारी भागात अनधिकृत प्लॉटिंग करून नागरिकांची फसवणूक झाली आहे. तरीही पालिकेने गांधारीची भूमिका घेत नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. बांधकाम परवाना देण्याचे अधिकार नगररचना विभागाला आहेत; पण त्यानंतर परवानगीतील अटी व शर्तीचे उल्लंघन, आरक्षित जागांवर बांधकामे, अशा कोणत्याच बाबीची जबाबदारी नगररचना विभाग घेत नसे. नवीन तरतुदीनुसार नगररचना विभागावर जबाबदारी निश्चित केली आहे.