शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत पूर्ण होणार : सांगलीत जखमी वन्यप्राण्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्रास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:17 IST

चांदोली, दंडोबा, सागरेश्वर आदी ठिकाणी जखमी प्राणी आढळतात. मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या धडकेत जायबंदी होण्याचे प्रसंग तर रोजचेच आहेत. काही ठिकाणी लोकांकडून झालेली मारहाणही जिवावर बेतते.

ठळक मुद्देवनविभागाकडून ३९ लाख रुपयांचा निधी

संतोष भिसे ।सांगली : जखमी वन्यप्राण्यांवर उपचारासाठी सांगलीत वन्यप्राणी प्राथमिक उपचार केंद्राला (ट्रान्झीट ट्रीटमेन्ट सेंटर) मंजुरी मिळाली आहे. वन विभागाने त्यासाठी ३९ लाखांचा निधी देऊ केला असून, सहा महिन्यात केंद्र प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीनंतरचे हे राज्यातील चौथे शासकीय उपचार केंद्र ठरले आहे.

जिल्ह्यात वनक्षेत्र मोठे असून वन्यप्राण्यांची संख्याही खूपच आहे. विविध घटनांत ते जखमी होतात, तेव्हा उपचारासाठी जनावरांचे स्थानिक दवाखाने किंवा मिरजेतील शासकीय पशुचिकित्सालयात न्यावे लागते. अनेकदा प्राणीप्रेमीच उपचार करुन त्यांना जंगलात नेऊन सोडतात. सध्या जवळजवळ दररोजच जिल्हाभरातून कोठे ना कोठे वन्यप्राणी जखमी झाल्याची वर्दी येतेच. चांदोली, दंडोबा, सागरेश्वर आदी ठिकाणी जखमी प्राणी आढळतात. मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या धडकेत जायबंदी होण्याचे प्रसंग तर रोजचेच आहेत. काही ठिकाणी लोकांकडून झालेली मारहाणही जिवावर बेतते. माकड, कोल्हे, लांडगे, मोर, साप, घुबड, गरुड हे पशु-पक्षी जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. पतंगाच्या मांजातही पक्षी अडकतात.

हे लक्षात घेऊन सांगलीत स्वतंत्र उपचार केंद्राची मागणी प्राणीप्रेमींनी केली. सांगलीचे उपवनरक्षक प्रमोद धानके यांनी नागपूरला राज्याच्या मुख्य वनरक्षकांकडे प्रस्ताव पाठविला, त्याला मंजुरी मिळाली. सुमारे ३९ लाखांचा निधी उपलब्ध केला. कुपवाडमध्ये वन विभागाच्या कार्यालयात केंद्र सुरु होईल. तेथे पशुवैद्यक, दोघे पॅराव्हेट तथा सहायक, मदतनीस असे कर्मचारी असतील. सुसज्ज रुग्णवाहिका, शस्त्रक्रियागृह, फिरते क्ष-किरण यंत्र, उपचार झालेल्या प्राण्यांसाठी विश्रांतीगृह, पिंजरे अशा सुविधा असतील. डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असेल. जखमी प्राण्याला रुग्णवाहिकेतून आणून उपचारानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.राज्यातील चौथे केंद्रराज्यात वनक्षेत्र व वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. शासकीय प्राथमिक उपचार केंदे्र तथा दवाखाने (ट्रान्झीट ट्रीटमेन्ट सेंटर) अवघे तीनच आहेत. नागपूर, चंद्रपूर व अमरावतीमध्ये उपचारांची सोय आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे आदी जिल्ह्यांत खासगी दवाखाने, स्वयंसेवी संस्था किंवा महापालिकेच्या दवाखान्यांत उपचार केले जातात. आता सांगलीत चौथे शासकीय केंद्र सुरु होईल. खासगी मालकीच्या प्राण्यांवर मात्र येथे उपचार होणार नाहीत, त्यासाठी पशुचिकित्सालयातच जावे लागेल.

 

टॅग्स :Sangliसांगलीbirds sanctuaryपक्षी अभयारण्य