आष्टा : आष्टा शहरात विविध शाळा, महाविद्यालये आहेत. तेथील अनेक शिक्षक, शिक्षिकांकडे मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून कार्यभार आहे. मात्र अनेक शिक्षकांची इतर ठिकाणी बदली झाल्याने त्यांचे काम बंद असल्याने या रिक्त ठिकाणी नवीन नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी विकास बोरकर यांच्यासह नगरसेवकांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे केली.
आष्टा शहरातील शिक्षकांकडे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यभार आहे. यातील अनेक शिक्षकांची बदली झाल्याने शहरातील काही प्रभागातील मतदार नोंदणी रखडली आहे. काही नावे कमी करावयाची आहेत, तर काही नावे समाविष्ट करायची आहेत; मात्र संबंधित शिक्षक यांची दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्याने संबंधितांच्या ठिकाणी आलेल्या नवीन शिक्षकांना अद्याप बीएलओचे काम दिलेले नाही. अजून जुनी नावे यादीला आहेत. त्यामुळे तातडीने नवीन नेमणुका कराव्यात, अशी मागणी विकास बोरकर, झुंजारराव पाटील, विराज शिंदे, दिलीप वग्याणी, अर्जुन माने, धैर्यशील शिंदे, सतीश माळी, प्रभाकर जाधव व नगरसेवकांनी केली.
लवकरच बैठक घेऊन नवीन बीएलओची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिले.
फोटो - ११०१२०२१-आयएसएलएम-आष्टा निवेदन न्यूज
: आष्टा येथे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे बीएलओची नेमणूक करावी, अशी मागणी करताना नगरसेवक.