शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १ हजारावर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : चांगल्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याचा बेत इच्छुकांनी आखल्यामुळे, सोमवारी सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य व सरपंच पदासाठी एकूण १ हजार १११ अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. अनेकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरले.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : चांगल्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याचा बेत इच्छुकांनी आखल्यामुळे, सोमवारी सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य व सरपंच पदासाठी एकूण १ हजार १११ अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. अनेकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरले.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. अजून चार दिवसांचा अवधी असला तरी, या कालावधीतील चांगले मुहूर्त साधण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. यातूनच सोमवारच्या मुहूर्तावर उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी झाली. जिल्ह्यातील दहा तालुक्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ सप्टेंबरला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशीही कमी प्रतिसाद मिळाला. सोमवारी मात्र मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले. सरपंच पदासाठी २0२ व सदस्य पदासाठी ९0९ असे एकूण १ हजार १११ अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारांची अर्जाच्या अनुषंगाने कागदपत्रे काढण्यासाठी तालुक्यांमधील सेतू कार्यालयात सोमवारीही मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता आले नाहीत. दि. २३ व २४ रोजी सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून अर्ज भरण्यास गर्दी झाली.खानापूर तालुक्यात ६२ अर्ज दाखलविटा : खानापूर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील दुसºया दिवसअखेर सरपंच पदासाठी ९ आणि सदस्य पदासाठी ६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. विटा तहसील कार्यालयाच्या इमारतीत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शनिवार व रविवार या दोन दिवशी सुटी होती. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला काहीअंशी गती आल्याचे दिसून आले. शुक्रवारी पहिल्यादिवशी बामणी येथील सरपंच पदासाठी एक, तर सदस्य पदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. सोमवारी सरपंच पदासाठी आळसंद येथील चार, तर सदस्य पदासाठी १७, कार्वे येथे सदस्य पदासाठी ४, बामणी येथे सरपंच पदासाठी एकूण २, तर सदस्य पदासाठी १२, घोटी खुर्द येथे सरपंच पदासाठी एक व सदस्यासाठी ५, वाझर येथे सदस्य पदासाठी ६, भाळवणी येथे सरपंच पदासाठी १ व सदस्य पदासाठी ११, घोटी बुद्रुक येथे सरपंच पदासाठी एक आणि करंजे येथे सदस्य पदासाठी एक, असे उमेदवारी अर्ज आले.तासगावात १२७ अर्ज दाखलतासगाव तालुक्यात २६ ग्रामपंचायतींमधून २५६ सदस्य निवडले जाणार आहेत. सरपंच पदासाठी २७, तर सदस्य पदासाठी १०० असे १२७ अर्ज दाखल झाले. सरपंच पदासाठी आरवडे, बेन्द्री, कुमठे, लिंब, मतकुणकी, नागेवाडी, निमणी, सावर्डे, बेन्द्री शिरगाव, नागाव निमणी, भैरववाडी, मणेराजुरी, वासुंबे, चिंचणी, अंजनी, बलगवडे, बस्तवडे, कचरेवाडी, खुजगाव, नेहरूनगर, पानमळेवाडी, वायफळे, योगेवाडी, उपळावी, वंजारवाड़ी या गावांचा समावेश आहे. सरपंचपदासाठी आरवडे १, बलगवडे २, बस्तवडे ८, चिंचणी १, खुसगाव १, कुमठे १, लिंब २, मणेराजुरी १, मतकुणकी २, नागेवाड़ी २, निमणी १, शिरगाव (क) १, वंजारवाड़ी १, वासुंबे ३ असे १४ गावांतून २७ अर्ज आले, तर सदस्य पदासाठी आरवडे १, बलगवडे २, बस्तवडे २०, चिंचणी ५, खुजगाव ३, लिंब १४, मणेराजुरी १०, मतकुणकी ८, नागेवाडी १, वंजारवाडी २, वासुंबे २४ असे गावातून १०० अर्ज आले. तहसीलदार सुधाकर भोसले, नायब तहसीलदार सुनील ढाले व निवडणूक विभागाच्या प्रफुल्ल पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात ९५ अर्जसोळा गावांतून सरपंच पदासाठी १५, तर सदस्यांकरिता ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. तहसील कार्यालयाचे आवार आज इच्छुक उमेदवारांच्या गर्र्दीने भरले होते; तर आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी नेटकॅफेवर झुंबड उडाली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्यादिवशी सर्वाधिक रांजणीतून तेवीस व कुकटोळीमधून वीस अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील सदस्यांकरिता हिंगणगावातून तीन, बोरगाव व खरशिंग, अलकूड (एम) प्रत्येकी एक, कोंगनोळीमधून दोन, आगळगावातून तीन, नागजमधून चार, हरोलीतून पाच, चुडेखिंडीतून आठ, लंगरपेठमधून पाच, जाखापुरातून नऊ, कुकटोळीतून सतरा, तर रांजणीमधून एकवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. एकीकडे सदस्यांकरिता ऐंशी, तर सरपंच पदासाठी पंधरा अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध गावातील स्थानिक नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत.कडेगाव तालुक्यात १०१ अर्जकडेगाव : कडेगाव तालुक्यात आजअखेर सरपंच पदासाठी १८, तर सदस्य पदासाठी ८३ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, आज दिवसभर कडेगाव तहसील कार्यालयात गर्दी होती. कित्येक इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते. गावोगावी प्रमुख राजकीय नेते तुल्यबळ व सक्षम उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने ग्रामपंचायतींची करवसुली जोमात सुरू आहे.