शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दिवाळीसाठी ‘माणुसकीची भिंत’, कपडे, फराळ साहित्य जमा करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 19:54 IST

गरीब, श्रीमंत, लहान आणि मोठा असे सर्व मतभेद विसरून सा-यांच्या आयुष्यात प्रकाशोत्सवाचे रंग भरणा-या दिवाळीचा आनंद गरजू कुटुंबांनाही मिळावा...

सचिन लाडसांगली : गरीब, श्रीमंत, लहान आणि मोठा असे सर्व मतभेद विसरून सा-यांच्या आयुष्यात प्रकाशोत्सवाचे रंग भरणा-या दिवाळीचा आनंद गरजू कुटुंबांनाही मिळावा या उद्देशाने सांगलीत माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.माणुसकीचे दर्शन घडविणा-या या उपक्रमात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचे कपडे, फराळ व अन्य दिवाळीसाठी आवश्यक सर्व साहित्य जमा केले जात आहे. हे जमा झालेले साहित्य गरजूंना वाटप करुन त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले जाणार आहे.

गोरगरिबांची दिवाळी आनंंदाने साजरी व्हावी, त्यांना किमान जुने-नवे कपडे कपडे मिळावेत, या उद्देशाने माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, कवलापूर (ता. मिरज) येथील डॉ. अमोल कोळी यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. वापरात नसलेले चांगले कपडे गरजूंसाठी जमा केले जात आहे. स्वच्छ धुऊन इस्त्री केलेल्या कपडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांचे कपडे, साड्या, पॅन्ट, शर्ट, ब्लॅन्केट,  शाल, स्वेटर्स, असे विविध प्रकारचे साहित्य जमा करुन घेतले जात आहे. जमा झालेले हेकपडे गरजू महिला, पुरुष व लहान मुलांना वितरीत केले जाणार आहे.

कपडे, दिवाळीचा फराळ, शालोपयोगी साहित्य युनूस महात (फौजदार गल्ली), मुश्ताकमुजावर (पंचशीलनगर, कॉलेज कॉर्नर), कौस्तूभ कुलकर्णी (दांडेकर हॉलसमोर, विश्रामबाग), प्रशांत भोसले, सोनू गवळी, जितेंद्र पत्की (पंचशीलनगर), सुजीत माळी (चिंतामणीनगर) राहूल वाले (संजयनगर), सागर मुळे (हळद भवन), सम्राट टेलर (पंचमुखी मारुती रस्ता, सांगली), विजय अपराध (संजीवनी लॅब, माधवनगर, ता. मिरज), अमित मालाणी, वैभव चौगुले, निखील जाधव (सांगली), डॉ. अमोल कोळी (धन्वंतरी क्नि यांच्याकडे साहित्य जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. हे सर्वसाहित्य अनाथाश्रम, वृद्धाश्रम व गरजू कुटूंबांना वाटप केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ अमोल कोळी ७०२०४६३००३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनसंयोजकांनी केले आहे.

दिवाळीदिवशी वाटपगेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात साड्या, पॅन्ड, शर्ट, लहान मुलांचे कपडे, शालोपययोगी साहित्य, फराळ मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या कपड्यांची वर्गवारी करण्याचे काम सुरु आहे. दिवाळीच्या पहिल्यादिवशी कपडे व फराळाचे वाटपकेले जाणा आहे. आता थंडीचा महिना सुरु होणार असल्याने काहीजणांनी स्वेटर, शाल व चादरही दिल्या आहेत.

टॅग्स :diwaliदिवाळी