शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'प्रतिसरकार' बनले होते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:49 IST

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला.

श्रीनिवास नागेसांगली : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला. जनतेत विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

महाराष्ट्रातील साताऱ्यात झाली स्थापना

'चले जाव' चळवळीत बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन झाली. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंहांनी ऑगस्ट १९४२ मध्ये प्रतिसरकार स्थापन केले. प्रशासनाचे कार्य भूमिगत क्रांतिकारकांनी हाती घेतले.

४ वर्षे चाललेले सरकारमहाराष्ट्रातील भूमिगतांनी सुनियोजित पद्धतीने चार वर्षे प्रतिसरकार चालवले, इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न देणारे हे एकमेव प्रतिसरकार होते. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन-शिक्षा करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत.

लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रमप्रतिसरकारने औध संस्थानची पुरोगामी राज्यघटना थोड्याफार फरकाने स्वीकारून त्यानुसार कारभार चालवला. प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करण्यात आली. शिवाय सात ते तेरा गावांची गट समिती आणि त्यावर नियंत्रणासाठी मध्यवर्ती समिती होती. लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रम जाहीर केला.

काय होता 'तो' कार्यक्रम

  • दरोडेखोर, गावगुंडांच्या बंदोबस्तासह सावकारी नियंत्रण कायदा व जमिनीचे फेरवाटप केले. दारुबंदी करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. स्त्रियांना मानसन्मान देत विवाहितांचा छळ थांबवला. अंधश्रद्धा, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला.
  • स्वतंत्र न्यायदान मंडळे स्थापन करून मोफत आणि त्वरित न्याय देण्याची व्यवस्था केली. चार वर्षांत प्रतिसरकारने ५० हजार खटल्यांचे निकाल देऊन ३४ कोटी रुपयांचा न्यायालयांचा खर्च वाचविला. अत्यंत कमी खर्चात लग्न करण्याची प्रथा सुरू केली. सार्वजनिक वाचनालये उघडली. साक्षरता वर्ग सुरु केले. 

दीड हजार गावे आणि तुफान सेना

सुमारे दीड हजार गावांत प्रतिसरकारचा कारभार सुरू होता. न्यायदान, लोकांचे संरक्षण आणि ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी 'तुफान सेनेची स्थापना करण्यात आली. या दलात पाच हजार तरुण सहभागी झाले, त्यांना हत्यारे चालवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

प्रतिसरकार'चे झाले 'पत्री सरकार'गुन्हेगारांवर, क्रांतिकारकांबद्दल चुगल्या करणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून शिक्षा देण्यात येऊ लागली. त्याचे पाय बांधून तळपायावर काठ्यांनी बडवले जायचे, त्यालाच 'पत्री मारणे' म्हटले जायचे. त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन प्रतिसरकार'चे 'पत्री सरकार' झाले.

टॅग्स :SangliसांगलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन