शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक मोहन आगाशे यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 20:05 IST

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे.

सांगली : येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे. रंगभूमीदिनी (दि. ५ नोव्हेंबर) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. मराठी नाट्यक्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  डॉ. कराळे यांनी सांगितले की, डॉ. मोहन आगाशे यांची कारकीर्द मोठी असून एमबीबीएसच्या शिक्षणानंतर त्यांनी मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. लहानपणापासूनच त्यांनी सई परांजपे यांच्या बालनाट्यात काम करायला सुरुवात केली. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा गाजवल्यानंतर १९५८ ला त्यांनी पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनच्या नाटकांमधून लक्ष वेधून घेतले. ‘अशी पाखरे येती’ या नाटकावेळीच ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांना मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील नाना फडणवीसांची भूमिका दिली.या व्यक्तिरेखेमुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले. या नाटकाचे त्यांनी सलग २० वर्षे देश-परदेशात आठशेहून अधिक प्रयोग केले. धन्य मी कृतार्थ मी, तीन पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, तीन चोक तेरा, वासांशी जीर्णानी, सावर रे यासह इतर नाटकांतही काम केले. अलीकडे ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचेही त्यांनी अडीचशेवर प्रयोग केले आहेत. ‘सामना’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर जैत रे जैत, सिंहासन, एक होता विदूषक, देवराई, वळू, विहीर या मराठी चित्रपटांबरोबरच निशांत, आक्रोश, मशाल, मृत्युदंड, गंगाजल, अपहरण, रंग दे बसंती या हिंदी चित्रपटातही त्यांच्या भूमिकांना रसिकांसह समीक्षकांची पसंती मिळाली. बारामती येथे झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी एक हजार भूकंपग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. 

आजवरचे पुरस्काराचे मानकरी...आतापर्यंत भावे गौरव पुरस्काराने बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे, भालचंद्र पेंढारकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, प्रभाकर पणशीकर, शरद तळवलकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर, मोहन जोशी, विक्रम गोखले, जयंत सावरकर यांच्यासह अनेक ख्यातनाम रंगकर्मींना गौरविण्यात आले आहे. बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणारी व वेगळ्या पध्दतीने मुलांची नाटके सादर करणा-या ‘ग्रिप्स’ चळवळीचा परिचय त्यांनी भारतीय रंगभूमीला करून दिला. डॉ. मोहन आगाशे यांना सांस्कृतिक प्रकल्पासाठी जर्मन सरकारने २००२ मध्ये ‘क्रॉस आॅफ आर्डरर मेरीट’ आणि मार्च २००४ मध्ये ‘गटे’ पदकाने सन्मानित करण्यात आले. १९९० च्या जानेवारी महिन्यात त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय १९९१ मध्ये ‘नंदीकर’ पुरस्कार, १९९६ मध्ये संगीत नाटक अकादमी, १९९८ मध्ये  ‘पुणे प्राईड’ असे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशे