शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकत्व तयार होत नसल्याचे अंनिसचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:49 IST

Corona vaccine Sangli : कोव्हिशिल्ड लस टोचून घेतल्यावर शरिरात चुंबकत्व तयार होत असल्याचे खोटे आहे, या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलनच्या सत्यशोधन समितीने केले आहे.

ठळक मुद्देकोरोना लसीमुळे शरीरात चुंबकत्व तयार होत नसल्याचे अंनिसचे स्पष्टीकरणस्टेनलेस चुंबकाला कसे चिकटेल?

संतोष भिसे सांगली : कोव्हिशिल्ड लस टोचून घेतल्यावर शरिरात चुंबकत्व तयार होत असल्याचे खोटे आहे, या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलनच्या सत्यशोधन समितीने केले आहे.समितीने प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, कोव्हिशिल्डची लस रक्ताद्वारे शरीरात पसरते. लसीमुळे चुंबकत्व निर्माण होत असल्यास संपूर्ण शरीरात व्हायला हवे, पण सध्या व्हायरल होत असणाऱ्या चित्रफितींत फक्त हातालाच चुंबकत्व येत असल्याचे दिसते.

दंडाच्या आसपास लोखंडी अथवा स्टीलच्या हलक्या वस्तू चिकटलेल्या दिसतात. असा दावा करणाऱ्या व्यक्तीने अंगावर काही वस्तू लपवल्या नसल्याची खात्री केली पाहिजे. वस्तुंना कोणताही चिकट पदार्थ लावला नाही ना ? हेदेखील तपासले पाहिजे. तसेच हा प्रयोग चिकित्सक तज्ज्ञांसमोर करायला हवा. संबंधित व्यक्तीने चुंबक शरिरावर बाळगल्याची शक्यता नाकारता येत नाही.समितीने सांगितले की, कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या सर्वच लाभार्थ्यांच्या शरिरात चुंबकत्व निर्माण व्हायला हवे, पण तसे झाल्याची उदाहरणे नाहीत. त्यामुळे लस घेतल्याने चुंबकत्व आल्याची कथा असत्य वाटते. चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने व त्यांच्या कुटूंबियांनी परवानगी दिल्यास सत्यता पडताळण्याची अंनिसची तयारी आहे. अंनिसच्या राज्य बुवाबाजी संघर्ष समितीचे सदस्य प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, केदारीनाध सुरवसे, भगवान रणदिवे, कमलाकर जमदाडे मिलिंद देशमुख यांनी हा खुलासा केला आहे.स्टेनलेस चुंबकाला कसे चिकटेल?स्टेनलेस स्टील चुंबकाला चिकटत नाही. फक्त लोखंडी वस्तूच चिकटतात. चित्रफितीत सर्व वस्तू स्टेनलेस स्टीलच्या दिसत आहेत. याचा अर्थ चुंबकीय आकर्षणामुळे वस्तु चिकटत नसून त्यामागे अन्य कारणे असल्याचे स्पष्ट होते असे अंनिसने म्हंटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली