शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्राणीमित्राने दिले घोणसला जीवदान, निर्जन ठिकाणी सोडले सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:34 IST

घन:शामनगर येथील एका घरानजीक घोणस जातीचा साप दिसल्यानंतर प्राणीमित्र सूरज शिंदे यांनी त्यास पकडून जीवदान दिले. या सापास पकडून त्यांनी निर्जन ठिकाणी सुखरुप सोडून दिले.

ठळक मुद्देप्राणीमित्राने दिले घोणसला जीवदाननिर्जन ठिकाणी सुखरुप दिले सोडून

सांगली : घन:शामनगर येथील एका घरानजीक घोणस जातीचा साप दिसल्यानंतर प्राणीमित्र सूरज शिंदे यांनी त्यास पकडून जीवदान दिले. या सापास पकडून त्यांनी निर्जन ठिकाणी सुखरुप सोडून दिले.घन:शामनगर येथील एका कुटुंबाला त्यांच्या घराच्या परिसरात साप दिसल्यानंतर त्यांनी प्राणीमित्र सूरज शिंदे यांना बोलावून घेतले. शिंदे यांनी या साडेतीन फुटाच्या घोणस सापास अगदी सुरक्षित पकडून शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी सोडून दिले.सूरज शिंदे म्हणाले, घोणस साप भारतात कुठेही आणि सहज दिसत आहेत. घोणसचे विष अतिशय जहाल असते. त्याचे विष व्हॅस्कुलोटॉक्सी प्रकारचे आहे. घोणस सापाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात.

या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे तो विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात.

टॅग्स :snakeसापSangliसांगली