शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या खाद्याचे दर गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:06 IST

अतुल जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क देवराष्ट्रे : दररोजच्या पशुआहारात लागणाऱ्या सरकी पेंडेच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. बाजारात सरकी ...

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : दररोजच्या पशुआहारात लागणाऱ्या सरकी पेंडेच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. बाजारात सरकी पेंडीचे भाव प्रतिटन ३६ हजाराच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे या दरवाढीने दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. मका व सरकीच्या दराचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे.सरकीचे भाव वाढल्यानेच कापसाला झळाळी आली आहे. पण, सरकीचे भाव अचानक वाढण्यामागे अमेरिकेतील मका पीक हे मुख्य कारण आहे. म्हणून सरकीच्या ढेपीच्या भावात वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मक्याचे १ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असलेले भाव २ हजार २०० रुपयांवर पोहोचले. तसेच सरकी ढेपीची मागणी वाढल्याने सरकीचे दरही वाढले आहेत. मका मिळत नसल्याने सर्वच पशुखाद्य महागले आहे. बाजारात सरकी पेंडीबरोबर इतर पशुखाद्यातही मोठी वाढ झाली आहे. गोळी १६५० रुपये, भुसा १०५० रुपये, खपरी २०००, मकाचुणी १४०० रुपये असा दर आहे. अचानकच मोठ्या प्रमाणात पशुखाद्य महागल्याने दूध उत्पादकांसमोर दुभत्या जनावरांबरोबरच भाकड जनावरे सांभाळणे कठीण बनले आहे.चारा टंचाईचे संकटऐन दूध टंचाईच्या काळात चाराटंचाईने डोके वर काढले आहे. दुधाला योग्य भाव मिळत नसताना, पशुखाद्याबरोबर चाराही महाग झाला आहे. महाग असूनही, तो मिळत नाही. ऊस, कडबा, मका यासह सर्वच चारा महाग झाला आहे. हा चाराही मिळेनासा झाला आहे. दूध व्यवसायात मंदी व खाद्य, चाराच्या प्रचंड टंचाईने दूध व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. वाढलेल्या खाद्यदराने दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.