शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

‘लाडक्या बहिणीं’च्या मदतीला आता येणार अंगणवाडी सेविका, अर्जातील त्रुटी तपासणार

By संतोष भिसे | Updated: October 2, 2024 17:50 IST

घरोघरी जाऊन तपासण्याची सूचना

संतोष भिसेसांगली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ताही महिलांच्या बँक खात्यांवर जमा होऊ लागला आहे; पण अनेक महिलांना पहिला हप्ताही मिळालेला नाही. त्यांच्या मदतीसाठी आता अंगणवाडी सेविका येणार आहेत. शासनाने त्यासंदर्भात मंगळवारी सूचना केल्या.जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत. पहिला हप्ता दोन महिन्यांचा म्हणजे ४५०० रुपये मिळाला. त्यानंतर आठवडाभरापासून १५०० रुपयांचा तिसरा हप्ता मिळू लागला आहे; पण एकही हप्ता न मिळालेल्या महिलांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या बँक खात्यांत त्रुटी आहेत. काहींचे अर्ज त्रुटींमुळे नामंजूर झाले आहेत किंवा मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. या महिलांच्या मदतीला अंगणवाडी सेविकांना पाठविण्यात येणार आहे. पैसे न मिळालेल्या महिलांची यादी शासनाकडून जिल्ह्याला पाठविण्यात येणार आहे. ती घेऊन अंगणवाडी सेविका संबंधित महिलेला भेटतील. त्यांच्या अर्जातील किंवा बँक खात्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करतील. त्यानंतर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र महिला योजनेत सामावून घेण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महिला व बालकल्याण विभागाला यासंदर्भात कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

२० टक्के महिलांना नाही मिळाले पैसेसांगली जिल्ह्यात ७ लाख १३ हजार महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी सुमारे २० टक्के महिलांच्या खात्यांवर आजअखेर पैसे जमा झालेले नाहीत. ‘शेजारच्या तसेच कुटुंबातील अन्य महिलांचे पैसे आले; पण माझे का नाही?’ याची चिंता या महिलांना लागून राहिली आहे. राज्यभरातही सुमारे २० टक्के महिलांच्या खात्यांवर पैसे जमा झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

का जमा होईनात पैसे?अनेक महिलांच्या बँक खात्यांची केवायसी झालेली नाही. काही महिलांचे बँक खाते ‘आधार’शी लिंक नाही, बँक खाते आधार सीडिंग झालेले नाही. यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडचणी आल्या आहेत. योजनेसाठी भरलेला अर्ज मंजूर झाल्याचे संदेश या महिलांना महिला व बालकल्याण विभागाकडून मिळाले. त्यानुसार पैसेदेखील पाठविण्यात आले. सध्या ते बँकेतील खात्यापर्यंत येऊन अडकले आहेत. खात्याच्या तांत्रिक त्रुटी दूर होताच त्यात जमा होतील. पैसे परत जाणार नाहीत असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगलीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा