शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ताणाने हैराण; लाडकी बहीण योजनेवर बहिष्कार टाकण्याचा अंगणवाडी सेविकांचा इशारा

By संतोष भिसे | Updated: July 12, 2024 15:33 IST

पैसे नकोत आणि फॉर्मही नकोत

सांगली : अंगणवाडी सेविकांना मूळ कामाव्यतिरिक्त अन्य कामांना जुंपू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना सांगोला येथे एका अंगणवाडी सेविकेचा नुकताच ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे या कामाचा फेरविचार करावा, अन्यथा कर्मचारी त्यावर बहिष्कार टाकतील असा इशारा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीतील डाटा एन्ट्री ऑपरेटर, तलाठी, सेतू,महा ई सेवा केंद्र यांच्यावरदेखील आहे. नारीशक्ती दूत ॲपवरही भरता येतो. पण गावात अंगणवाडी सेविका या कामासाठी सहज उपलब्ध होते म्हणून त्यांच्यावर बोजा टाकला जात आहे. फॉर्म भरण्यासाठी महिला अंगणवाडीत सकाळपासून रांगा लावून थांबत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपली नेहमीची कामेही करता येत नसल्याची स्थिती आहे.इंटरनेट नसल्याने फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत. दिवसभरात पाच-दहा फॉर्म कसेबसे भरले जात आहेत. यामुळे महिलांचा रोष वाढत असून सेविकांना त्रास सहन करावा लागत आहे. ॲप सुरु होत नाही असे सांगितल्यास महिला अंगावर धावून येतात, अंगणवाडीत कोंडून ठेवतात, वेळेचे भान न ठेवता फॉर्म भरण्यासाठी पिच्छा पुरवितात अशा तक्रारी राज्यभरातून येत आहेत. शासनाचा दबाव असल्याने महिला व बालविकास खात्याचे अधिकारीही सेविकांच्या तक्रारी ऐकून घेण्यास तयार नाहीत.त्यामुळे अंगणवाडी कृती समितीने शासनाला नोटीस देऊन त्रास कमी करण्याची विनंती केली आहे. अन्यथा तहसीलदारांप्रमाणे आम्हालाही बहिष्कार टाकावा लागेल असा इशारा दिला आहे.

दैनंदिन कामांचा बोजाअंगणवाडी सेविकांवर अगोदरच कामांचा बोजा आहे. पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरायची, गृहभेटी अपडेट करायचा, अंगणवाडीचे दप्तर अपडेट ठेवायचे यासह शासकीय योजना राबवायच्या असा कामाचा ताण आहे. त्यामध्ये पुन्हा महिलांचे फॉर्म भरण्याची जबाबदारी टाकल्याने सेविका हैराण झाल्या आहेत.

पैसे नकोत आणि फॉर्मही नकोतसंघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील यांनी सांगितले की, काही ठिकाणी सात-आठ सेविकानी अंगणवाडी सोडून एकत्र बसून अर्ज भरावेत असे अधिकारी सांगत आहेत. एक फॉर्म भरल्यानंतर ५० रुपये शासन देणार आहे. पण सध्याची स्थिती पाहता फॉर्मही नको आणि पैसेही नकोत अशी केविलवाणी अवस्था झाली आहे.

टॅग्स :Sangliसांगली