२)२८महादेव माने
३)२८शरणाप्पा नागठाणे
कवठेमहांकाळ : चारुतासागर प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या ‘चारुतासागर उत्कृष्ट कथा स्पर्धे’त यवतमाळचे डाॅ. अनंत सूर यांच्या 'नियती' या कथेने प्रथम क्रमांक पटकावला. सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडीचे महादेव माने यांच्या 'पाण' या कथेला द्वितीय, तर औरंगाबादच्या शरणाप्पा नागठाणे यांच्या 'मिजास' या कथेस तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून २५ कथा लेखकांनी ऑफलाईन व ऑनलाईन कथा पाठवून आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून, या अगोदर सुधीर कदम, हरिश्चंद्र पाटील, डाॅ. विशाखा कांबळे हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अजित पुरोहित आणि डाॅ. आबासाहेब शिंदे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ साहित्य संमेलनात करण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. आबासाहेब शिंदे यांनी दिली.