शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आमराई वृक्षतोडप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा; आयुक्तांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:22 IST

आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या असून त्यांचे म्हणणे आल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देआमराई वृक्षतोडप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा; आयुक्तांची माहितीसांगली महापालिकेच्या कामगारांनाही नोटिसा

सांगली : आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या असून त्यांचे म्हणणे आल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात आमराई उद्यानात आॅफिसर्स क्लबच्या टेनिस कोर्टवर पालापाचोळा पडतो, म्हणून वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षतोडीवरून शहरात मोठा गदारोळ उडाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात, सागर घोडके, मयूर घोडके यांनी आमराईतच ठिय्या मारत कारवाईची मागणी केली. त्यानंतर सामाजिक संघटना व निसर्गप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या प्रकरणात आॅफिसर्स क्लबचे सदस्य असलेले वरिष्ठ अधिकारी, मोठ्या ठेकेदारांवर संशय व्यक्त होत होता. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा होती.वृक्षतोडीबाबत आयुक्त खेबूडकर म्हणाले की, वृक्षतोडप्रकरणी आॅफिसर्स क्लबचे क्रीडा अधिकारी पै, कामत व झाडे तोडणारा ठेकेदार यांचे जबाब घेण्यात आले आहेत. ठेकेदाराला दूरध्वनी करून झाडे तोडण्यास सांगितले. वास्तविक महापालिकेने अथवा वृक्ष समितीने परवानगी दिली नसतानाही ही झाडे तोडली गेली.

झाडे तोडण्याचे कंत्राट दिलेल्या रेड्डी याला फांद्या तोडण्यास सांगितले होते. पण त्याने काही झाडे बुंध्यापर्यंत तोडली. या झाडांना कीड लागल्याने ती बुंध्यापर्यंत तोडल्याचे त्याने जबाबात सांगितले आहे. महापालिकेने कंत्राटदार रेड्डी याच्याविरूद्ध शहर पोलीस व जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. त्यांचे म्हणणे आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली