नाभिक संघटेची बैठक तासगावमध्ये झाली, यावेळी शशिकांत गायकवाड, शरद झेंडे, अशोक सपकाळ आदी उपस्थित होते.
श्री अमोल काळे यांची नाभिक संघटनेच्या सांगली जिल्हा संघटकपदी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नाभिक संघटनेच्या जिल्हा संघटकपदी अमोल काळे यांची निवड झाली. नाभिक महामंडळाच्या तासगाव तालुका कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष अनिल काशिद यांच्या अध्यक्षतेखाली तासगावमध्ये झाली. राज्य संघटक शशिकांत गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अमोल काळे यांच्या निवडीचा निर्णय झाला. प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अनिल काशिद यांनी निवड जाहीर केली. काळे यांनी सांगितले की, पदाचा वापर करून संघटनेच्या व समाजाच्या विकासाचे कार्यक्रम राबविले जातील. जिल्हा सचिव शरद झेंडे, उपाध्यक्ष राजेश गायकवाड, बाळासाहेब जाधव, विठ्ठल काळे, अशोक सपकाळ, सुभाष जाधव, दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब अस्वले, प्रभाकर गायकवाड, तासगाव तालुकाध्यक्ष अमित वास्के, सागर गायकवाड, सुशांत काळे, धनाजी जाधव, रवींद्र साळुंखे, मारुती गायकवाड आदी उपस्थित होते.