कोकरुड : अंबाबाईवाडी (हत्तेगाव ता. शिराळा) येथील दि. २६, २७ रोजी भरविण्यात येणाऱ्या लाखो भक्तांचे श्रदास्थान असलेल्या श्री अंबाबाईची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. फक्त देवाचे धार्मिक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत व प्रशासनाचे नियम पाळून करण्याचा निर्णय यात्रा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
ह. भ. प. हरिबुवा अस्वले यांनी शिवशंकर व तुळजाभवानी (अंबाबाई) या दोन मंदिरांची स्थापना १९४२ साली माघी पोर्णिमेदिवशी केली. त्याच स्थापना दिनानिमित्त प्रत्येक वर्षी शिवभवानी मातेची यात्रा हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येत असते. महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला पालखी सोहळा आयोजित करून महाप्रसादाचे वाटप भक्त मंडळींकडून होत असते. परंतु यावर्षी कोरोनामुळे वर्षभरापासून येणाऱ्या पौर्णिमेला मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा केला जात आहे. दि. २६, २७ रोजी भरणारी देवीची यात्रा रद्द करून फक्त दोन्ही देवांचे धार्मिक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रशासनाचे नियम पाळून करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे.