शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

कृषी प्रक्रिया उद्योगांच्या वाढीकडे नेहमीच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:32 IST

सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ...

सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी म्हणावे तेवढे प्रयत्न न केल्यामुळेच मोठे कृषी प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभे राहिले नाहीत. उद्योग भवनकडे मात्र जिल्ह्यात ३५०० कृषी प्रक्रिया उद्योग सुरू असल्याची नोंद आहे.उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना’ आणि केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ लागू केल्या आहेत. प्रत्यक्षात या योजनांचे अनुदान लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच लाटत आहेत.योजना चांगल्या असूनही लाभार्थींना अनुदानच वेळेवर मिळत नसल्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत अडचणी असल्याचे नवीन उद्योजकांनी सांगितले. उत्पादित मालास योग्य बाजारपेठही उपलब्ध नाही.आतापर्यंत काय झाले उपाय?1ड्रायपोर्ट हे कृषी मालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. ते रेल्वे, रस्ते व सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टची खा. संजयकाका पाटील यांनी घोषणा केली. पण, त्याची अंमलबजावणी झालीच नाही.2 सहकारी कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले. पण, ढिसाळ व्यवस्थापन आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे ते उद्योग बंद पडले आहेत.3 कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होत आहेत. या नवीन उद्योजकांना मार्केटिंगचा अनुभव नसल्यामुळेही ते बंद पडत आहेत.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग केंद्र आणि राज्य शासनाने स्वत: पुढाकार घेऊन वाढविण्याची गरज आहे. तरच शेतीचा विकास होण्यास मदत होईल.2कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी शासनाने वीज, जागा मोफत उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. तरच हे उद्योग वाढतील आणि टिकतील सुध्दा.3अनुदान देऊन कृषी प्रक्रिया उद्योग वाढणार नाहीत, तर ते वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने किमान दहा वर्षाचे धोरण आखण्याची गरज आहे. करामध्ये सवलत आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.