शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत पुरुषांच्याबरोबरीने महिला अधिकारीही आघाडीवर; सांगली जिल्ह्यात वर्षभरात १३ गुन्ह्यांमध्ये महिला किती..

By संतोष भिसे | Updated: December 21, 2024 16:41 IST

संतोष भिसे सांगली : आधुनिक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घोडदौड करीत असताना लाचखोरीत तरी कशा मागे ...

संतोष भिसेसांगली : आधुनिक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घोडदौड करीत असताना लाचखोरीत तरी कशा मागे राहतील? सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीचे १३ गुन्हे घडले, त्यामध्ये पाच लाचखोर महिलांचा समावेश आहे.लाच घेण्यात महसूल आणि पोलिस हे दोन विभाग आघाडीवर आहेत. तर महिला लाचखोरांमध्ये या दोन्ही विभागांतील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही लाचखोर महिला निलंबित आहेत, तर काहींचा निलंबन कालावधी संपून त्या पुन्हा ‘लोकसेवे’त रुजू झाल्या आहेत. इस्लामपूर व येडेनिपाणी येथे तलाठी, वायफळे येथेही तलाठी, समाजकल्याणमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि मंगळवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी म्हणजे लाचखोर महिलांच्या प्रतिनिधी ठरल्या आहेत. महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, अशी शासनाची व समाजाची भूमिका असताना या अधिकारी महिला लाचखोरीमध्ये सबल होत असल्याचे दिसत आहे. विविध शासकीय खात्यांत महिलांचे प्रमाण वाढत आहे. तेथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडे शंकेने पाहिले जाईल, अशी स्थिती हे लाचखोर महिला कर्मचारी निर्माण करीत आहेत. विश्रामबागमधील महिला पोलिसाने तब्बल ५० हजारांची लाच घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे आहे. त्यावरून या महिलेचा आत्मविश्वास किती बळावला असावा, हे लक्षात येते.महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यांची लाचखोरी विशेष चर्चेची ठरली आहे. आतापर्यंत सापडलेल्या महिला तलाठ्यांपैकी एकीने वाळू तस्करांवर चांगलाच ‘वचक’ निर्माण केला होता. अर्थात, या ‘वचका’ची पुरेपूर वसुली त्यांनी केली असावी, अशी शंका घेण्यास जागा आहे. लाच घेताना ती रंगेहात सापडल्याने या शंकेला बळ मिळते. विशेष म्हणजे लाचखोरीमध्ये तिने पुरुष कर्मचारी व सहकाऱ्यांनाच साखळीत ओढले होते, हेदेखील स्पष्ट झाले आहे. तक्रार आल्याने ती जाळ्यात सापडली; पण तक्रार आली नसलेली किती प्रकरणे तिने लीलया हातावेगळी केली याचाही तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करण्याची गरज आहे.

महिला म्हणून स्वस्तात काम नाहीचलाच मागण्यात सामान्यत: पुरुष अधिकारी व कर्मचारी दबदबा निर्माण करतात. रक्कम ठरवताना रेटून बोलतात; पण या महिलांनी मागितलेली किंवा स्वीकारलेली रक्कम पाहता, त्यांची मागणीही स्वस्तातील नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येते.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणWomenमहिला