शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आघाडीचे सरकार शक्य : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:39 IST

इस्लामपूर : राज्यात काँग्रेस पक्षासह मित्रपक्षांशी आघाडीची समाधानकारक चर्चा सुरू आहे. राज्यात आघाडीचे सरकार येऊ शकते, असा विश्वास राष्ट्रवादीचे ...

ठळक मुद्देराजारामनगर येथे बूथ समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

इस्लामपूर : राज्यात काँग्रेस पक्षासह मित्रपक्षांशी आघाडीची समाधानकारक चर्चा सुरू आहे. राज्यात आघाडीचे सरकार येऊ शकते, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी, कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांच्या खोट्या व अपप्रचारापासून सावध राहावे, असे आवाहनही केले.

आ़ पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील बूथ समितींच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक घेऊन त्यांना बूथ समितीच्या माध्यमातून काय कामे करणे अपेक्षित आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुस्मिता जाधव, महिला तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव, शहराध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, कर्नाटक राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार लाखाच्या फरकाने पराभूत झाले असून, सध्या सुरू असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकात राजस्थान भाजपच्या हातातून जाणार आहे, तर मध्य प्रदेशमध्येही तीच परिस्थिती आहे़

संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी समितीच्या कामाचा आढावा घेतला़ विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.या बैठकीस प्रा़ शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड़ चिमण डांगे, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अ‍ॅड़ धैर्यशील पाटील, संग्राम फडतरे, अजय चव्हाण, भास्कर पाटील, सौ़ सुनीता देशमाने, पीरअल्ली पुणेकर, आयुब हवलदार, देवराज देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मी राज्यात, जबाबदारीने काम कराआमदार जयंत पाटील म्हणाले, आपल्या मतदारसंघात २८४ बूथ असून, बहुतेक ठिकाणी बूथ समित्या तयार होऊन चांगले काम सुरू आहे़ उर्वरित ठिकाणी सक्रिय महिला, ज्येष्ठांसह विविध घटकांना सामावून घेऊन समित्या सक्षमपणे उभ्या करा़ तसेच पक्षाचे मोबाईल अ‍ॅप डाऊ नलोड करून घ्या़ या अ‍ॅपच्या माध्यमातून पक्षाच्यावतीने सूचना, विविध घटना, प्रचार-अपप्रचाराबद्दल आपणास माहिती देऊ़ आपणही आपल्या भागातील अडचणी, सूचना करू शकता़ आपण नव्या मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या भागातील मतदारांचा कल जाणून घ्या़ प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने मला राज्यात फिरावे लागणार असल्याने, आपणास जबाबदारी घेऊन काम करावे लागेल़ येत्या ९ डिसेंबरला बोरगाव येथे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे.राजारामनगर येथे बूथ समित्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजय पाटील, दादासाहेब पाटील, भरत देशमुख, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली