तालुक्यातील जाधववाडी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
आमदार पाटील म्हणाल्या, तालुक्यातील शिक्षकांनी नेहमीच गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. कष्ट व चिकाटी अंगी बाळगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळत आहे.
शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर म्हणाले, शिक्षक समितीने शिक्षकांच्या भवितव्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. यापुढील काळातील देशात पहिल्यांदाच शिक्षकांसाठी अद्ययावत हॉस्पिटल उभे करणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, यू. टी. जाधव, किरण गायकवाड, सयाजी पाटील, बाबासाहेब लाड यांनी मनोगत व्यक्त केले.
शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष मनोज कोळेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. विनोद पाटील यांनी स्वागत, शशिकांत बजबळे यांनी प्रास्ताविक, नरेंद्र जाधव, शुभांगी घाटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुनील गुरव, किसन पाटील, शशिकांत भागवत, दयानंद लाड, महादेव माळी, राजेंद्र बजबळे, चंद्रकांत कोळी, विश्वनाथ काशीद आदी उपस्थित होते.
फोटो-१७ कवठेमहाकाळ १