शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा बाजार रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST

सांगली : महापालिका क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावरील आरक्षण उठविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी जोरदार तयारी चालविली आहे. ही आरक्षणे उठविण्यास विरोध ...

सांगली : महापालिका क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावरील आरक्षण उठविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी जोरदार तयारी चालविली आहे. ही आरक्षणे उठविण्यास विरोध होत असून, आता सर्वपक्षीय कृती समितीही मैदानात उतरली आहे. समितीची शनिवारी बैठक होत असून, त्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या १७ रोजी होत आहे. या ऑनलाईन सभेत कुपवाड येथील प्राथमिक शाळा व क्रीडांगणांचे आरक्षण उठविण्यावर चर्चा केली जाणार आहे. कुपवाड येथील सात एकर जागेपैकी अडीच एकर जागेवर हे आरक्षण आहे. या आरक्षित जागेत घरे बांधण्यात आल्याचा दिखावा करीत ते उठविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. गुंठेवारी कायद्यात ९९ टक्केहून अधिक घरे असतील, तरच आरक्षण रद्द होऊ शकते. वास्तविक या जागेवर ३० ते ३५ घरे आहेत. उर्वरित जागा मोकळी आहे. संपूर्ण जागेवरील आरक्षण उठवल्यास मोकळी जागा बिल्डराच्या घशात जाऊ शकते. विश्रामबाग येथील मोकळ्या जागेवरील आरक्षणही उठविण्याच्या हालचाली सुरू आहेत. या जागेची किंमत तर कित्येक कोटींच्या घरात आहे.

ही आरक्षणे उठविण्यास नागरिक जागृती मंचने विरोध केला आहे. त्यात आता सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी शनिवारी समितीची बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षण उठविण्याविरोधात आक्रमक लढा उभारण्याबाबत चर्चा होणार आहे. आरक्षित जागा कित्येक वर्षापासून विकसित होऊ शकलेल्या नाहीत. त्यात आता भूखंडमाफिया पुन्हा आरक्षण उठविण्यासाठी सक्रिय झाल्याचा आरोपही साखळकर यांनी केला.

चौकट

भूखंडधारकांना टीडीआर द्यावा

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे आरक्षित जागांचा मोबादला देण्यात अडचणी आहेत, हे आम्हालाही मान्य आहे. पण आता सरकारने महापालिकेला टीडीआर देण्याची व्यवस्था केली आहे. त्यानुसार टीडीआर देऊन या जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी साखळकर यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे.