शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 17:51 IST

प्रत्येक क्षेत्राला कवेत घेत लोकांना घरीच बंदिस्त करून पाहणाऱ्या कोरोनाने आता भाविकांना देवापासूनही दूर केले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांचे दरवाजे मंगळवारपासून बंद झाले असून, पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंदच राहतील, असे संबंधित प्रशासनांनी जाहीर केले आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरे बंदतीर्थक्षेत्र श्री रेवणसिध्द मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

सांगली : प्रत्येक क्षेत्राला कवेत घेत लोकांना घरीच बंदिस्त करून पाहणाऱ्या कोरोनाने आता भाविकांना देवापासूनही दूर केले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांचे दरवाजे मंगळवारपासून बंद झाले असून, पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंदच राहतील, असे संबंधित प्रशासनांनी जाहीर केले आहे.सांगलीच्या प्रसिद्ध पंचायतन गणपती मंदिराने सांगली व मिरजेतील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नित्यनियमाने दररोज हजारो भाविक सांगलीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

आता त्यांना देवाचे दर्शन घेण्यासाठी अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सांगलीसह खानापूर, आटपाडी येथील प्रमुख मंदिरांनीही अनिश्चित काळासाठी दर्शन बंद केले आहे.तासगाव शहरातील ऐतिहासिक श्री गणपती मंदिरासह आरवडे येथील इस्कॉन मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम प्रशासनाकडून बंद करण्यात आले असून, सर्व मंगल कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.औदुंबर (ता. पलूस) येथील कृष्णाकाठावर वसलेले श्री दत्त मंदिर श्रींच्या दर्शनासाठी बेमुदत बंद केले आहे. भाविकांच्या तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टने हे पाऊल उचलले आहे.

भारतासह जगात कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगाचा प्रसार मोठ्याप्रमाणात होत आहे. त्याचा प्रसार कमी होण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शाळा, कॉलेज, मॉल, सिनेमागृह बंद ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारे सभारंभ बंद केले आहेत.महाराष्ट्रासह  कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खानापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिध्द मंदिर भाविकांना दर्शनासाठी मंगळवारपासून बंद ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, हे मंदिर दि. ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याganpatiगणपतीSangliसांगली