शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आक्कुबार्इंनी जपली ओव्यांची संस्कृती आधुनिकीकरणाच्या जमान्याला छेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:17 IST

वारणावती : आधुनिकीकरणाच्या जमान्यात दळण-कांडणाच्या गिरण्या गावात आल्या आणि जात्याची घरघर बंद झाली. मिक्सरचा खरखराट स्वयंपाकघरात ऐकू येऊ लागला.

ठळक मुद्देऐकू येते जात्यावरच्या ओव्यांची मंजुळ घरघर

गंगाराम पाटील ।वारणावती : आधुनिकीकरणाच्या जमान्यात दळण-कांडणाच्या गिरण्या गावात आल्या आणि जात्याची घरघर बंद झाली. मिक्सरचा खरखराट स्वयंपाकघरात ऐकू येऊ लागला. या यांत्रिकीकरणामुळे जाते अडगळीत पडले. त्यासोबतच जात्यावरच्या ओव्याही नामशेष होऊ लागल्या.

मात्र याला सोंडोली (ता. शाहुवाडी) येथील आक्कुबाई शामराव पाटील या अपवाद ठरल्या आहेत. आक्कुबार्इंनी बहिणाबार्इं चौधरींच्या संस्काराचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. आजही त्या ओव्यांतून संस्कृतीचे जतन करताना दिसतात.नात्यातील हळुवारपणा, सामाजिक संवेदनशीलता, कृषी जीवनाबद्दलचा आपलेपणा, प्राणी-पक्षी यांच्याविषयीचा कळवळा आणि देव-देवतांबद्दलची श्रध्दा आक्कुबाई मावशींच्या ओव्यांतून जाणवते.

आक्कुबाई यांनी चकचकीत फरशीच्या घरात आजही जात्याला आपल्यापासून लांब केलेले नाही. आपली सख्खी जाऊ किसाबाई पाटील जी चुलत बहीणही आहे, तिच्यासोबत नात्याचा ओलावा जपत, त्या जात्यावरील ओव्या गात गुण्यागोविंदाने नांदत आहेत.सध्याच्या आधुनिक काळात नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र आक्कुबाई यांनी मनाची, भावनिकतेची श्रीमंती जपली आहे.त्यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉ. सदा पाटील लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनीही लोकसंस्कृतीची जपणूक करणाऱ्या आईचा आदर्श घेऊन जुन्या शस्त्रांचा, नाण्यांचा व पत्रांचा अनमोल संग्रह केला आहे.