शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अवीट ‘गीतरामायण’ने रसिकांना जिंकले

By admin | Updated: April 20, 2016 00:42 IST

‘लोकमत’चा उपक्रम : नाट्यगृह हाऊसफुल्ल; सुधीर गाडगीळ यांचा सत्कार

सांगली : श्रीरामाच्या सुंदर कथाविश्वात घेऊन जाणाऱ्या ‘गीतरामायण’ या संगीत कार्यक्रमाने सांगलीकर रसिकमनांना जिंकले. एकापेक्षा एक अवीट गोडीच्या गीतांना आणि त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणास टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . ‘लोकमत’ सखी मंच व रामायण अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामनवमीनिमित्त भावे नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, गायक श्रीरंग जोशी उपस्थित होते. यावेळी गाडगीळ यांच्याहस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. संयोजिका आभा पाटणकर यांनी स्वागत केले.राजा दशरथाच्या कथेपासून रामजन्म, रामाचा वनवास, युध्द, वानर सेनेचा पराक्रम, असा हा श्रीरामायणातील अजरामर घटनांचा संगीतमय प्रवास निवेदक दीपक पाटणकर यांनी रसिकांसमोर मांडला. त्या काळातील श्रीरामायणातील कथेचा आजच्या वास्तवाशी कसा संबंध आहे, याचे उदाहरणही दिले. या कार्यक्रमाची सुरुवात श्रीरंग जोशी यांच्या ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती...’ या गाण्याने झाली. ‘शरयू तीरावरी, ज्येष्ठ तुझा, माता न तू वैरिणी, देव हो, या बाळानो...’ या श्रीरंग जोशी याने गायिलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिषेक तेलंग याने ‘दशरथा घे हे..., नकोस नौके..., दैवजात... सेतू बांधा रे, प्रभो मज एकची वर द्यावा...’ ही सुंदर भावपूर्ण गाणी सादर केली. कीर्ती पेठे यांनी ‘राम जन्मला ग सखी राम जन्मला...’ हे रामजन्माचे गाणे सादर केले. यशश्री जोशी हिने ‘आनंद सांगू किती, या इथे लक्ष्मणा, तोडीता फुले...’ ही गाणी सादर केली. साक्षी हेब्बाळकर हिने ‘स्वयंवर झाले सीतेचे...’ आणि ‘विरुप झाली शुर्पणखा...’ ही गाणी सादर केली. आस्था ओगले हिने ‘निरोप कसला, धन्य ती शबरी श्रीरामा’ ही गाणी सादर केली. छोटा गायक श्रीनिवास हसबनीस यांनी ‘गीतरामायणा’तील ‘नकासे नौके’ हे गाणे सादर केले.संगीत संयोजन परेश पेठे यांनी श्रीरामाची सुंदर कथा, गाण्यांची लयबध्दता तबल्यांच्या सुंदर सुरावटीतून रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांना भास्कर पेठे (संवादिनी), परेश पेठे (तबला), मनाली रानडे (बासरी), प्रशांत भाटे (सिंंथेसायझर), प्रशांत कुलकर्णी (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. (प्रतिनिधी)‘गा बाळांनो श्रीरामायण...’कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘गीतरामायणा’तील अवीट गोडीची, मोहवून टाकणारी अजरामर गाणी... निवेदक दीपक पाटणकर यांचे अभ्यासपूर्ण निवेदन... परेश पेठे यांचे अप्रतिम संगीत संयोजन... जोडीला नवोदित गायक कलाकारांची गाणी... सारा सोहळा जणू श्रीरामाच्या स्वागतासाठी होता. कार्यक्रम संपल्यानंतर ‘अवघ्या आशा श्रीरामार्पण... गा बाळांनो श्रीरामायण...’ असे वातावरण नाट्यगृहात होते. कवी गदिमा... गायक, संगीतकार, ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांच्या लोकप्रियतेमुळे घरा-घरात, मना-मनात वसलेले ‘गीतरामायण’ ६० वर्षांनंतरही तसेच टवटवीत असल्याचा अनुभव कार्यक्रमातून आला.