शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडीत अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मध्यरात्री उभारला; जागेवरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:52 IST

समितीकडून जागा शासकीय असल्याचा दावा

आटपाडी : आटपाडी शहरातील दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाच्या आवारातील बोटॅनिकल गार्डनमध्ये मंगळवारी मध्यरात्री अंधारात अज्ञात व्यक्तींनी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवल्याने शहरात खळबळ उडाली. घटनेनंतर पुतळ्याच्या जागेबाबत मालकीचा वाद आणि अतिक्रमणाचे आरोप केले आहेत.आटपाडी एज्युकेशन सोसायटीने पोलिस निरीक्षक, आटपाडी यांना दिलेल्या निवेदनात पुतळा त्यांच्या गार्डनमध्ये चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याचे नमूद केले आहे. पुतळा तातडीने हलवून पोलिस संरक्षणात सुरक्षित स्थळी ठेवावा, अशी मागणी सोसायटीने केली आहे. सोसायटीचे म्हणणे आहे की, शैक्षणिक संकुल परिसर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपणबंद असून, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय पुतळ्याची स्थापना केली आहे, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीने तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी आणि महाविद्यालय प्राचार्यांना दिलेल्या निवेदनांतून वेगळी बाजू मांडली आहे. समितीच्या मते, पुतळा ज्या ठिकाणी बसवला आहे ती सरकारी पडजागा (गट क्र. ४२०५/३ क्षेत्रफळ ०३.०१.०० हेक्टर) असून, तिच्यावर सोसायटीने अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभी केली आहे. पत्रकार परिषदेत समितीने सातबारा दाखला सादर करून संबंधित जागेची मालकी माहिती मांडली समितीचा आरोप आहे की, सध्या या सर्व जमिनीवर सोसायटीचा कब्जा आहे आणि पुतळ्याभोवती उभारलेल्या बेकायदेशीर कम्पाऊंडमुळे नागरिकांना पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. या पत्रकार परिषदेस रासपाचे माजी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, भाजप युवा नेते उमाजी चव्हाण, रासपाचे शुभम हाके, विशाल सरगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी पुतळ्याची स्थापन कोणी केला माहीत नाही, मात्र ज्या ठिकाणी पुतळा बसवला आहे तेथे संस्थेने अतिक्रमण केले असून, तेथील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. अहिल्यादेवींच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, जयवंत सरगर, जे. जे. जानकर, लक्ष्मण सरगर, विष्णुपंत अर्जुन, भाजपाचे तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले, चंद्रकांत काळे, सागर तळे यांच्यासह धनगर समाजातील युवकांनी पुष्पहार अर्पण करत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.अतिक्रमण तत्काळ काढासमितीने तहसील कार्यालय व नगरपंचायतीकडे दिलेल्या निवेदनांमधून पुतळ्याभोवतालचे अतिक्रमण तत्काळ काढून टाकावे, अशी मागणी केली आहे. पुतळा कोणी बसवला हे माहीत नसले तरी, ज्या ठिकाणी बसवला आहे तेथील अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे समितीने स्पष्ट केले.प्रशासनाकडे सर्वांचे लक्षया प्रकरणावरून पोलिस, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पत्रव्यवहार सुरू असून, प्रशासनाची पुढील भूमिका या वादाचे भवितव्य ठरवणार आहे. या घटनेमुळे आटपाडी शहरात वातावरण तापले आहे.