शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कृषि दिन व कृषि संजीवनी मोहिमेचा उत्साहात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 19:44 IST

Agriculture Sector Sangli : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंत आज जिल्ह्यामध्ये कृषि दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये खरीम हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात दि. 21 जून ते 1 जुलै दरम्यान राबविण्यात आलेल्या कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला.

ठळक मुद्देकृषि दिन व कृषि संजीवनी मोहिमेचा उत्साहात समारोपअधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या लागवड पध्दतीच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन

सांगली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंत आज जिल्ह्यामध्ये कृषि दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये खरीम हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात दि. 21 जून ते 1 जुलै दरम्यान राबविण्यात आलेल्या कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी उपस्थित शेतकरी तसेच रब्बी हंगाम पिक स्पर्धा सन 2020-21 मधील विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले व खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.आत्मा सभागृह, विजयनगर, सांगली येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि उपसंचालक प्रभाकर पाटील, तंत्र अधिकारी मयुरा काळे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी अमित कवठेकर, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील विजेते शेतकरी उपस्थित होते.यावेळी कृषि दिनाचे औचित्य साधून रब्बी हंगाम पिक स्पर्धा सन 2020-21 मधील हरभरा, गहू, रब्बी ज्वारी पिकासाठी विभागस्तर व जिल्हास्तरावर विजेत्या झालेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरावरून सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील विविध पिकात अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या लागवड पध्दतीच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपस्थित अधिकारी व पिक स्पर्धेतील विजेते शेतकरी यांच्याहस्ते कृषि चिकित्सालय फळरोपवाटीका कुपवाड कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप केला. प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली