शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

सांगली जिल्ह्यात शेतजमीनीचे दर ४२ वर्षांत दीडशे पटींनी वाढले, पिकाखालील क्षेत्र किती उरले..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: May 13, 2025 17:53 IST

मोठे शेतकरी झाले अल्पभूधारक

अशोक डोंबाळे

सांगली : शेतीचा वाढता खर्च आणि घटलेले उत्पन्नामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची व्यथा शेतकऱ्यांची आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने शेती परवडत नसल्याचे बोलले जात असले, तरी अलीकडे शेती हा गुंतवणुकीच्या दृष्टीने अग्रस्थानी विषय ठरला आहे. कारण गेल्या ४२ वर्षांत सर्वसाधारण शेतीचे प्रतिएकर भाव तब्बल १५० पटीपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे शेती उत्पन्नापेक्षा गुंतवणुकीतून जास्त परतावा देत आहे. डॉक्टर, शासकीय अधिकारी, बिल्डर्ससह व्यावसायिकांनी जमिनीचे भाव वाढविल्याचे चित्र आहे.खासगीत शेतीचे कोट्यवधींचे व्यवहार होत असले तरी रेडी रेकनर दराने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवण्यात येत आहेत. शेती गुंतवणूक म्हणून खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. शहर परिसर व महामार्गालगतची शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, बिल्डर्स, उद्योजक, व्यावसायिक गुंतवणूक करत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी आणि जमीन विकसित करणाऱ्या ठेकेदारांकडील माहितीनुसार गेल्या ४२ वर्षांत जमिनीचे दर दीडशे पटींनी वाढले आहेत.

मोठे शेतकरी झाले अल्पभूधारकवाढती लोकसंख्या, तुलनेत शेतीचे क्षेत्र तेवढेच असल्याने तुकडीकरण होत आहे. शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक बनले आहेत. त्यातच शेतीचे प्रतिएकर भाव लाखमोलाचे झालेले आहेत. त्यामुळे शेती खरेदी करणे हे मूळ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. आगामी पिढ्यांचा विचार करून शेतकरी शेती विकत नाहीत. त्यातच शेती खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होत असल्याने चढ्या भावाने व्यवहार होत आहेत.

जिल्ह्यात पिकाखालील क्षेत्र उरले ५.७६ लाख हेक्टरजिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र आठ लाख ६१ हजार हेक्टर असून, त्यापैकी पाच लाख ७६ हजार ९०३ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २९ लाखांवर गेली आहे. या आकड्यानुसार जिल्ह्यात प्रती व्यक्ती केवळ ०.१९ एकर शेती उपलब्ध आहे. मात्र, गेल्या १३ वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेतली असता, सध्याच्या काळात प्रती व्यक्ती शेती क्षेत्राची उपलब्धता आणखी घटलेली आहे. परिणामी, शेती क्षेत्रावर असलेला दबाव वाढत असून, शेतीचे तुकडेही अधिक लहान होत चालले आहेत.

गेल्या ४० वर्षांतील प्रतिएकर शेतीचे भाव

वर्ष - शेतीचा दर

  • १९८२ - ३००००
  • १९८७ - ४००००
  • १९९२ - १०००००
  • १९९७ - १६००००
  • २००० - १८००००
  • २००५ - २२००००
  • २०१० - १००००००
  • २०१५ - २००००००
  • २०२० - ३००००००
  • २०२५ - ५००००००
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीfarmingशेती