शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अग्रणीचा जिल्ह्यातील प्रवास ५५ किलोमीटरचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST

अग्रणीचा उगम खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो. तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाली आहे, असे सांगण्यात येते. या ...

अग्रणीचा उगम खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो. तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाली आहे, असे सांगण्यात येते. या नदीच्या खोऱ्यात सात पाणलोट क्षेत्रे आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी असे तालुके येतात. या नदीची एकूण लांबी ६८ किलोमीटरची असून महाराष्ट्र १०४ आणि कर्नाटकातील तीन गावे ह्या खोऱ्यात येतात. अग्रणी नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. ती अथणी तालुक्यातील हुल्लगबल्ली गावात जाऊन कृष्णा नदीस मिळते. यादरम्यान महांकाली नावाची २२.५ किलोमीटर लांबीची उपनदीही अग्रणीला येऊन मिळते.

राज्य शासन, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले आहे. हे पात्र खानापूर तालुक्‍यात २२ किलोमीटर आहे. उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे आदी गावांतील स्थानिकांनी या कार्यात सक्रिय श्रमदान दिले.

चौकट

केंद्र शासनाचा पुरस्कार

अग्रणीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण केले. दीडशे वर्षांनतर ती पुन्हा प्रवाहित झाली व २८ हजार शेतकऱ्यांना फायदा झाला. याची प्रेरणा घेऊन कर्नाटकातील तीन गावांनी लोकवर्गणीतून हे कार्य पुढे चालवले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दलच केंद्र सरकारकडून अग्रणीच्या कार्याला पुरस्कार मिळाला आहे.