शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांना साथीच्या रोगांचा ताप

By admin | Updated: October 6, 2015 00:37 IST

रोगांच्या साथी : मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लूचा वाढता प्रसार; अतिसाराच्या रुग्णांतही लक्षणीय वाढ--लोकमत विशेष

शीतल पाटील -सांगली --परतीच्या पावसाने शहरवासीय एकीकडे सुखावले असले तरी, साथीच्या रोगांच्या वाढत्या प्रसारामुळे चिंतेतही वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला अशा दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक नागरिकांना ताप चढला आहे. त्यात स्वाइन फ्लूने सातजण दगावल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. हगवण, अतिसाराच्या रुग्णातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेचीही आता पळापळ सुरू झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यामते वातावरणात झालेले बदल जीवाणूंच्या वाढीस पोषक असतात. यामुळे व्हायरल फीवरचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. सर्दी, खोकला, ताप या साथीचे जानेवारी ते सप्टेंबरअखेर ९५७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या कालावधित कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, हीच एकमेव जमेची बाजू आहे. गेल्या आठ महिन्यात गॅस्ट्रोचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. मिरजेत गॅस्ट्रोसदृश साथीने काही महिन्यांपूर्वी थैमान घातले होते. त्यानंतर महापालिकेने काही ठोस उपाययोजनाही आखल्या होत्या. गटारीतून जाणारे नळ कनेक्शन बदलण्यात आले असून काही ठिकाणी मुख्य पाईपलाईनच दुसरी टाकण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात गॅस्ट्रोचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान हगवणीचे १३०३, अतिसाराचे १०५९ रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाच्या साथीनेही काही काळ डोके वर काढले होते. आतापर्यंत १३ जणांना मलेरिया झाला होता. त्यात शहराबाहेरील सहा जणांचा समावेश आहे. गरोदर महिलांना स्वाइनची लसस्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना स्वाइन होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे गर्भवती महिलांना स्वाइनची लस देण्यात येणार आहे. सध्या पालिकेकडे १०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तीन महिन्यावरील गर्भवती महिलेला ही लस दिली जाणार असून ती ऐच्छिक असल्याचे डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. नागरिकांनी घेतली स्वाइनची धास्तीगेल्या पंधरा दिवसांत शहरात स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला आहे. या साथीमुळे सात जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. शासकीय रुग्णालयात आतापर्यंत ३० संशयित दाखल झाले होते. त्यापैकी २० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून दहा जणांना स्वाइनची लागण झाली होती. अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. खासगी रुग्णालयाकडून या रुग्णांची माहिती महापालिकेला दिली जात नाही. अगदी स्वाइन फ्लूच्या शेवटच्या टप्प्यात रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. डेंग्यूचे ५४ संशयितशहरात डेंग्यूचे ५४ संशयित शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांचा अहवाल निगेव्हिट आल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. डेग्यूचे डास हे स्वच्छ साचलेल्या पाण्यात निर्माण होतात. स्वच्छ साचलेले पाणी हे घरात मोठ्या प्रमाणात असते. यामुळे बहुतांश घरात डासांची पैदास होत असते. त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. कमी पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. टाक्या, फ्लॉवरपॉट, मनी प्लँट इत्यादी ठिकाणी पाण्याचा साठा असतो. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे कुलकर्णी म्हणाल्या.