शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विभागीय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:24 IST

सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती झाल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत वर्चस्व मिळविले.

ठळक मुद्देसांगलीत विभागीय शालेय स्पर्धा सांगली, कोल्हापूर आघाडीवर, राज्य स्पर्धा धुळ्यात

हरिपूर , दि. २७ : सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती झाल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत वर्चस्व मिळविले.

स्पर्धेचे उद्घाटन भारतीय तलवारबाजी महासंघाचे सहसचिव वीरेश यादव (उत्तराखंड), श्री गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते व खो-खो महासंघाच्या पंच समितीचे अध्यक्ष भूपेंदर सिंग (जम्मू- काश्मीर) यांच्याहस्ते लढत लावून झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. स्पर्धा समन्वयक शंकर भास्करे यांनी स्वागत केले. शुभम जाधव यांनी आभार मानले.

यावेळी विशाल कोळी, रामभाऊ सुतार, आदित्य चोरमले आदी उपस्थित होते. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचा अनुक्रमे एक ते चार क्रमांकांचा अंतिम निकाल असा : १९ वर्षे मुले : ईपी प्रकार : गिरीश जकाते (सांगली), प्रथम शिंदे (हातकणंगले), सिध्दांत जोशी (तासगाव), श्रेयस तांबवेकर (सांगली). १४ वर्षे मुले : ईपी : यश भंडारी (पेठवडगाव), अर्णव जगताप (तासगाव), ऋषिकेश पोवार (कोल्हापूर), प्रथमेश लाड (कुंडल). फॉईल : मार्तंड झोरे (रत्नागिरी), ऋषिकेश पोवार (कोल्हापूर), श्रीयश अनगळ (पेठवडगाव), वरद जकाते (पेठवडगाव). सेबर : पृथ्वीराज तेली (पेठवडगाव), हर्षवर्धन पवार (सांगली), केदार पाटील (पेठवडगाव), सुयश जमदाडे (वाई). १७ वर्षे मुले : फॉईल : श्रेयस भेंडवडे (पेठवडगाव), श्रवण काटकर (पन्हाळा), योगिराज पाटील (तासगाव), ओंकार चिटणीस (कुंडल). सेबर : जयंत पाटील, आदित्य शिंदे व प्रज्ज्वल कुंभोजे (तिघे पेठवडगाव), हर्षवर्धन पाटील (सांगली).

आदित्यराज घोरपडे, प्रफुल्ल धुमाळ, राहुल सरडे, दीपक क्षीरसागर, रोहित मोहिते, सुधीर जमदाडे, संजय झोरे, के. एकनाथ, संदीप जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्या खेळाडूंची धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

टॅग्स :Sportsक्रीडाSangliसांगली