शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही जीवनयात्रा संपविली, जत येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:24 IST

नुकतीच झाली होती कारागृहातून सुटका

जत : जत येथील पत्रकारनगरमधील प्रकाश कामगोंडा नागराळे (वय ३०) या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ८) दुपारी घडली. जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने जत शहर परिसरात खळबळ उडाली आहे.प्रकाश हा जत नगर परिषदेच्या सेवेत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी प्रतीक्षा हिने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल प्रकाशचे सासरे तथा प्रतीक्षाचे वडील राजशेखर भीमाशंकर बिराजदार (रा. सोलापूर) यांनी प्रकाश व त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. माहेरून पैसे आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी प्रतीक्षाचा छळ केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार जत पोलिसांनी प्रकाशसह त्याचे वडील कामगोंडा, आई निंबव्वा यांना अटक केली. होती. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी व नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. प्रकाशच्या विवाहित बहिणी प्रमिला जनमेजय बिराजदार व प्रियंका पाटील यांचेही नाव गुन्ह्यात दाखल आहे, मात्र, त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. महिनाभरापूर्वी न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर तिघेही जामिनावर सुटून घरी परतले होते. तेव्हापासून प्रकाश विमनस्क अवस्थेत होता. मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली. याची नोंद रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात झाली.

रुग्णालयाच्या आवारात झाली होती मारहाणप्रकाश व प्रतीक्षा यांचा विवाह चार ते पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. मे महिन्यात प्रतीक्षाने राहत्या घरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. त्यावेळी सोलापूरहून आलेल्या सासरच्या संतप्त नातेवाइकांनी प्रकाश व त्याच्या आई-वडिलांना जत ग्रामीण रुग्णालयाच्या आवाराच्या मारहाण केली होती. प्रतीक्षाच्या मृतदेहावर पाटील कुटुंबीयाच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दीड वर्षांच्या मुलीला घेऊन प्रतीक्षाचे आई-वडील सोलापूरला गेले होते.