शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर जल्लोष करताना मोटारीने धडक, बिसूरचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:12 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष साजरा करीत जात असताना भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने बिसूर (ता. मिरज) येथील उदय गणपती साळुंखे (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र संदीप ऊर्फ बट्या पाटील (३०) हा गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करीत जात असताना अपघातमाधवनगर रस्त्यावर मोटारीची धडकअपघातात मित्र गंभीर जखमी

सांगली , दि. १८ :  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष साजरा करीत जात असताना भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने बिसूर (ता. मिरज) येथील उदय गणपती साळुंखे (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र संदीप ऊर्फ बट्या पाटील (३०) हा गंभीर जखमी झाला आहे.

माधवनगर रस्त्यावर पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोसमोर मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बिसूर येथे मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाला लागला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. दुचाकीवरून तरूण गुलाल उधळीत गावातून फेरफटका मारत होते.

उदय साळुंखे व संदीप पाटील हेही दुचाकीवरुन माधवनगरहून बिसूरच्या दिशेने जल्लोष करीत निघाले होते. माधवनगर पत्रा डेपोजवळ गेल्यानंतर त्यांना भरधाव मोटारीची धडक बसली. यामध्ये दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर उजव्या बाजूला जाऊन रस्त्यावर पडले.

उदय याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन तो जागीच मृत पावला, तर संदीप पाटील हा गंभीर जखमी झाला. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी रुग्णवाहिका व पोलिसांना बोलावून घेतले. जखमीला रुग्णालयात हलविण्यास मदत केली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच मृत व जखमींच्या नातेवाईक व मित्रांनी सांगलीच्याशासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. विच्छेदन तपासणीनंतर रात्री उशिरा उदयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कुटुंबाचा आधारउदय साळुंखे विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत. त्याचे वडील अपंग आहेत. तो वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. तो कुटुंबाचा आधार होता. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातElectionनिवडणूक