शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

फायर ऑडिट : सांगली सिव्हिलसाठी पैसे मागून प्रशासन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 11:00 IST

Hospital Sangli : राज्यात कोठेतरी रुग्णालयात आग लागते, निष्पाप रुग्ण दगावतात, अशावेळी राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे फर्मान शासन काढते. गेल्या दिड-दोन वर्षांत किमान चारदा असे आदेश निघाले. पण जुन्या शिफारशींचीच अंमलबजावणी होत नसेल तरर नव्याने ऑडिटचा उपद्व्याप कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देसांगली सिव्हिलसाठी पैसे मागून प्रशासन थकलेउदंड झाल्या तपासण्या आणि नोटीसा, आता अंमलबजावणी करा

सांगली : राज्यात कोठेतरी रुग्णालयात आग लागते, निष्पाप रुग्ण दगावतात, अशावेळी राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे फर्मान शासन काढते. गेल्या दिड-दोन वर्षांत किमान चारदा असे आदेश निघाले. पण जुन्या शिफारशींचीच अंमलबजावणी होत नसेल तरर नव्याने ऑडिटचा उपद्व्याप कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.भंडार्यातील आगीनंतर सरकारी रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते, त्याचवेळी सांगली, मिरज सिव्हिलसह जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांची तपासणी झाली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भंडारा दुर्घटनेपूर्वीच ऑडिटचे आदेश दिले होते. तत्पूर्वी सांगली शासकीय रुग्णालयाचे ऑडिट २०१८ मध्ये झाले होते. अग्नीशमनविषयी कामांसाठी १ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला, तो अजूनही धूळ खात पडला आहे. आता विरारमधील दुर्घटनेनंतर पुन्हा ऑडिटचे आदेश निघाले आहेत.सांगली-मिरजेत रुग्णालयांच्या नव्या इमारतींसाठी कोट्यवधींचा खर्च होत असताना अग्नीरोधी उपायांसाठी एक-दोन कोटींचाही खर्च केला जात नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. सिव्हिल प्रशासन व सार्वजनिक बांधकामच्या पाहणीत रुग्णालयांच्या भल्यामोठ्या पसार्यात पुरेशी अग्नीरोधी यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले. ठिकठिकाणी सिलिंडर नाममात्र अडकवून वेळ मारुन नेली जात आहे.सिव्हिलमध्ये स्प्रिंकलर्स, स्मोक डिटेक्टर्स, गरजेनुसार वीजवाहिन्या व अंतर्गत फिटींग, आग्नीशमनासाठी पाणीपुरवठा, नवे फायर एक्स्टीनगिशर्स बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी पावणे दोन कोटींची फाईल आरोग्य संचालनालय, अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम या सर्वांकडे फिरुन आली आहे, पण निर्णय झालेला नाही. राज्यात दुर्घटना घडताच ऑडिटच्या वल्गना करणारे शासन शुद्ध फसवणूक करत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.सात कोविड रुग्णालयांत सिलिंडरदेखील नाहीसांगली-मिरजेतील सात खासगी कोविड रुग्णालयांत साधा फायर एक्सटिनगिशरदेखील नसल्याचे अग्नीशमन विभागाच्या पाहणीत आढळले. मिरज रस्त्यावरील एक खासगी कोविड रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल आहे, तेथे अग्नीशमन यंत्रणेचा पत्ताच नसल्याचे दिसले.यंत्रणा सुसज्ज, कर्मचारीच नाहीसांगली, मिरजेतील काही खासगी कोविड रुग्णालयांत सुसज्ज अग्नीशमन यंत्रणा आहे. तारांकित रुग्णालयांच्या दर्जाची उपकरणे बसविली आहेत, पण ती हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच नसल्याचे फायर ऑडिटमध्ये आढळले. ऑडिट सुरु असताना तात्पुरता एखादा कर्मचारी उभा केला जातो, अधिकार्यांची पाठ फिरताच दुर्लक्ष होते. अग्नीशमन विभागाने त्यांना नोटीसा बजावल्या असून प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यास सांगितले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली