सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू असले तरी विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात विश्रामबाग पोलिसांनी आठशे जणांवर कारवाई करत एक लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा विश्रामबागचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिला आहे.