शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

खोटी माहिती दिल्यास जागेवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अधिकाºयांनी झिरो पेंडन्सी अभियानात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीवेळी अधिकारी, कर्मचाºयांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अधिकाºयांनी झिरो पेंडन्सी अभियानात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीवेळी अधिकारी, कर्मचाºयांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल योजनेबाबत केलेल्या कामाची माहिती प्रोजेक्टरद्वारे विभागीय आयुक्तांना दिली. या कामाचे कौतुक करीत दळवी म्हणाले की, जिल्हा प्रशासनाची ही गती कौतुकास पात्र आहे. या अभियानात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न अधिकाºयांनी करावा. सत्य माहितीच द्यावी. कामास थोडा उशीर झाल्यास अपवादात्मक परिस्थितीत त्या गोष्टी सहनही केल्या जातील. मात्र खोटी माहिती जाणीवपूर्वक दिल्यास अशा अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई अटळ आहे. सध्या सुरू असलेले जिल्हा प्रशासनाचे काम हा टीमवर्कचा उत्कृष्ट नमुना आहे. यापुढेही हे टीमवर्क कायम राहिले पाहिजे. त्यामुळे कर्मचाºयांना कामाचा आनंद लुटण्याबरोबरच कौटुंबिक आयुष्यही आनंदाने लुटता येईल.लवकरच तालुकास्तरावर भेट देऊन या अभियानाची पाहणी करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर एक महिन्यापेक्षा जादा कालावधीचे, प्रांतस्तरावर २ महिन्यापेक्षा अधिक आणि जिल्हाधिकारी स्तरावर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ काम प्रलंबित राहू नये, याची दक्षता यापुढील काळात घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.जमिनींच्या आदेशाचे वाटपजिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी प्रदान करण्याच्या आदेशाचे वाटप बुधवारी विभागीय आयुक्तांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी एका प्रकल्पग्रस्ताने वीज कंपनीकडून कनेक्शन मिळत नसल्याची तक्रार मांडली. नियमाप्रमाणे नंबर येईल तेव्हा वीज मिळेल, असे उत्तर कंपनीचे अधिकारी देत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणून वीज कंपनीने प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने कनेक्शन द्यावे, याबाबत कंपनीशी शासनाचा पत्रव्यवहार होण्याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.नगरपालिका, ग्रामपंचायतींसाठीही अभियानझिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हे अभियान आता नगरपालिका आणि ग्रामपंचायतींसाठीही राबविण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकाºयांनीही त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन दळवी यांनी यावेळी केले.