शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खते देणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:32 IST

सांगली : खरीप हंगामाचे नियोजन करताना भेसळयुक्त बियाणे बाजारात येणार नाहीत व त्यांचा शेतकºयांकडून वापर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतकºयांना आगामी खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्याची दक्षता घ्या, तसेच भेसळयुक्त बियाणे देऊन शेतकºयांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे ...

सांगली : खरीप हंगामाचे नियोजन करताना भेसळयुक्त बियाणे बाजारात येणार नाहीत व त्यांचा शेतकºयांकडून वापर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतकºयांना आगामी खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्याची दक्षता घ्या, तसेच भेसळयुक्त बियाणे देऊन शेतकºयांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे दिले.दरम्यान, विनंती करूनही वीज जोडण्या केल्या जात नसल्यावरून आमदारांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाºयांना धारेवर धरले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील यांच्यासह आमदारांची उपस्थिती होती.देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकºयांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा आहे. या हंगामात शेतकºयांना अधिक सुविधा देऊन त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न केला पाहिजे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार असल्याने योजनेचा प्रसार शेवटच्या घटकांपर्यंत करा. शेतकºयांची हेतुपुरस्सर अडवणूक आणि फसवणूक करणाºया निविष्ठा विक्रेत्यांची तसेच त्यांच्या कंपन्यांची गय करू नका, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.कृषी विभागाच्या आढाव्यावेळी पीक विमा योजनेची आकडेवारी न सांगता त्याचा शेतकºयांना लाभ कसा मिळेल याची माहिती देण्याची सूचना खा. संजयकाका पाटील यांनी केली.मूग व उडदाची विटा येथे खरेदी केंद्रे नसल्याबद्दल आ. अनिल बाबर यांनी मुद्दा उपस्थित केला. जे पिकते त्याठिकाणी खरेदी केंद्र उभारण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी आ. शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, महावीर जंगटे, राजेंद्र साबळे, मकरंद कुलकर्णी, सुरेश मगदूम आदी उपस्थित होते.पैसेवारीवर चर्चाआटपाडी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याच्या मुद्द्यावर आ. बाबर यांनी नाराजी व्यक्त केली. शेजारच्या माण, सांगोला, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, या तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना, आटपाडीचीच अधिक का लावण्यात आली? असा सवाल करत, पैसेवारी ठरविण्याचे काम पारदर्शी झाले नाही तरीही याचे खापर आमदारांवर फोडण्यात येत आहे, हे चुकीचे आहे. या प्रश्नावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.