कवठेएकंद : नागाव कवठे (ता. तासगाव) येथील सुमारे एक एकर उसाला वीज तारेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
नागाव येथील शेतकरी श्रीकांत मगदूम, गुंडाप्पा साजणे यांच्या उसाला मंगळवारी दुपारी बाराच्यादरम्यान आग लागली. शेजारील कवलापूर हद्दीतील शेतात काम करत असलेल्या शेतकरी बबन हाक्के, सोन्या माळी (कवलापूर), रामभाऊ गवंडी (कुमठे), अरविंद पाटील (काकडवाडी) यांना उसातून धूर येऊ लागल्याचे दिसून आले. सर्व शेतकऱ्यांनी जिवाची पर्वा न करता पेटलेल्या फडात हाताने ऊस मोडून आग पुढे जाणार नाही, याची काळजी घेतली व आग आटोक्यात आणली. धाडसी शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ५० एकर ऊस वाचवण्यात यश आले. या आगीमध्ये एक एकर ऊस जळून खाक झाला.